Nitin Gadkari On New Pune-Bangalore Highway | ‘सांगली, साताऱ्याच्या दुष्काळी तालुक्यातून नवा पुणे-बेंगलोर महामार्ग’ – नितीन गडकरी

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Nitin Gadkari On New Pune-Bangalore Highway | केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आज (शनिवारी) सांगली (Sangli News) जिल्हा दौऱ्यावर आहेत. तेथील महामार्ग लोकार्पण कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या (Sangli And Satara) दुष्काळी तालुक्यांतून जाणाऱ्या नव्या पुणे – बेंगलोर महामार्गाची (Pune – Bangalore Highway) घोषणा केली. रस्त्यासाठी चाळीस हजार कोटींची तरतुद केली जाणार आहे. यामुळे सध्याच्या पुणे – बेंगलोर महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. (Nitin Gadkari On New Pune-Bangalore Highway)

 

”प्रस्तावित पुणे – बेंगलोर महामार्ग पुणे, सातारा, खंडाळा, फलटण, खटाव, खानापूर, तासगाव व कवठेमहांकाळ असा होईल. पुण्यात रिंग रोडला जोडला जाईल. यानिमित्ताने मुंबई ते बेंगलोर असा थेट महामार्ग अस्तित्वात येईल. महामार्गांच्या कामावेळी आम्ही स्वखर्चाने शेतकऱ्यांना शेततळी काढून देऊन, तेथील माती, दगड आदी साहित्य महामार्गासाठी वापरु. यानिमित्ताने जलसंधारणाचेही काम होईल. असं नितीन गडकरी म्हणाले.

 

”रांजणीजवळ (सांगली) 2 हजार हेक्टर जागा असल्याचे कळते. सरकारने ती जागा मला द्यावी. तेथे ड्रायपोर्ट, लॉजिस्टिक पार्क, सॅटेलाईट पार्क उभा करु. विमान उतरेल असा साडेतीन किलोमीटरचा कॉंक्रीटचा रस्ता तयार केला जाईल. पोर्टसाठी अर्धा – अर्धा खर्च राज्य (State Government) व केंद्र शासन (Central Government) करेल.” अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. (Nitin Gadkari On New Pune-Bangalore Highway)

पुढे बोलताना गडकरी म्हणाले, ”महामार्गांवर सर्व लोहमार्गांवर आम्ही भुयारी रस्ते किंवा उड्डाणपूल उभारले.
शहरांतही अनेक ठिकाणी लोहमार्ग आहेत. या सर्व ठिकाणी पूल किंवा भुयारी रस्ते उभारुन महाराष्ट्र फाटकमुक्त करण्याचा निर्धार आहे.
महामार्गांवर 120 प्रतितास या गतीने प्रवासाला परवानगी देणार आहोत.
नव्या महामार्गांसाठी केंद्र शासन 40 टक्के सिमेंट आणि स्टीलचा वापर करते, पण कंपन्यांनी काळाबाजार सुुरु केला,
त्यामुळे आता बुटामीनचा वापर वाढविणार आहोत.
अन्नदाता असणारा शेतकरी यानिमित्ताने उर्जादाताही बनेल. बुटामीनसाठी दिल्लीत लवकरच बैठक घेणार आहे.
महामार्गांसाठी त्याचा वापर सक्तीचा करणार असल्याचंही ते म्हणाले.”

 

दरम्यान, यावेळी रत्नागिरी – नागपूर महामार्गांतर्गत (Ratnagiri-Nagpur Highway) सांगली ते सोलापूर दरम्यानच्या बोरगाव ते वाटंबरे आणि सांगली – सोनंद जत या महामार्गांचे लोकार्पण नितीन गडकरींनी डिजीटल पद्धतीने केले.
यावेळी जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil), खासदार संजय पाटील (Sanjay Patil),
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), आमदार सुधीर गाडगीळ (Sudhir Gadgil),
आमदार सुरेश खाडे (Suresh Khade), रणजितसिंह नाईक – निंबाळकर (Ranjit Singh Naik – Nimbalka),
विक्रम सावंत (Vikram Sawant), जयंत आसगावकर (Jayant Asgaonkar), अरुण लाड (Arun Lad),
अनिल बाबर (Anil Babar), मानसिंगराव नाईक (Mansingrao Naik), सदाभाऊ खोत (Sadabhau Khot),
गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), सुभाष देशमुख (Subhash Deshmukh), मकरंद देशपांडे (Makrand Deshpande), पृथ्वीराज देशमुख (Prithviraj Deshmukh), प्राजक्ता कोरे (Prajakta Kore) आदी उपस्थित होते.

 

Web Title :- Nitin Gadkari On New Pune-Bangalore Highway | union minister nitin gadkari announces new pune bangalore highway from sangli sataras drought taluka

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा