‘काँग्रेसचे ते आरोप म्हणजे राजकारणातील डर्टी ट्रीक्स’ : नितीन गडकरी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – येडीयुरप्पा यांच्या डायरीचा आधार घेत काँग्रेसने येडीयुरप्पा यांच्यावर जे काही आरोप केले आहे तो म्हणजे काँग्रेसचा बालिशपणा आहक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. शिवाय, येडीयुरप्पा यांच्या डायरीची आयकर विभागाने चौकशी केली आहे. डायरीवरील ती स्वाक्षरी खोटी करून ते कागद तयार करण्यात आले आहे. या राजकारणातील ‘डर्टी ट्रिक्स’ आहेत. हे हास्यास्पद आरोप असून गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असेही गडकरी म्हणाले आहेत.

बी एस येडीयुरप्पा यांनी कर्नाटकात सत्तेवर असताना कोट्यावधी रुपयांची देवाणघेवाण झाली आहे असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला होता. इतकेच नाही तर, एका पत्रकार परिषदेत बोलताना सुरजेवाला यांनी एक डायरी समोर आल्याचा दावाही केला होता. या डायरीमध्ये 1800 कोटींच्या व्यवहाराबद्दल लिहिलं आहे असा दावाही सुरजेवाला यांनी केला होता. एका इंग्रजी मॅगझिनने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताचा आधार घेत काँग्रेसने हे आरोप केले होते.

या डायरीच्या प्रत्येक पानावर येडीयुरप्पा यांचं हस्ताक्षर आहे असा आरोप काँग्रेसने केला. मात्र डायरीच्या सत्यतेबाबत कोणताही दावा काँग्रेसने केलेला नाही. या संपूर्ण प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपच्या बड्या नेत्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यावर बोलताना गडकरी यांनी हे हास्यास्पद आरोप असून गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे म्हटले आहे.

नागपुरातून किमान साडे चार लाखांच्या रेकॉर्ड मतांनी निवडणूक जिंकेल असेही यावेळी ते म्हणाले. प्रियंका गांधी यांनी गंगेतून प्रवास केला आहे. गंगेचे पाणी ही चाखले. हे आमचा कामाची पावती आहे. एकाप्रकारे त्यांनी आमच्या कामाला प्रमाणपत्रच दिले आहे, असेही ते म्हणाले.