Nitin Gadkari | ‘… तेव्हा मी फक्त दोनच व्यक्तींना वाकून नमस्कार केला’, नितीन गडकरींनी सांगितला ‘तो’ किस्सा

0
254
Nitin Gadkari | relive the memory of gopinath munde by nitin gadkari
File Photo

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Late BJP leader Gopinath Munde) यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला सर्वच पक्षाच्या नेत्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले मी जेंव्हा भाजपचा अध्यक्ष झालो तेव्हा फक्त दोनच व्यक्तींना खाली वाकून नमस्कार केला. त्यात एक होते ते म्हणजे लालकृष्ण आडवाणी (LK Advani) आणि दुसरे गोपीनाथ मुंडे तेंव्हाच त्यांनी मला विचारलं तुला कोणतं खातं पाहिजे? अशी आठवण नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी यावेळी सांगितली.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) गोपीनाथ मुंडे यांचा वारसा यशस्वीपणे पुढे नेत आहेत. राजकारणात मी ज्यांच्या नेतृत्वात काम केले त्या गोपीनाथ मुंडे यांचा मला अभिमान आहे. मी भाजपचा अध्यक्ष झालो त्यावेळी फक्त दोनच व्यक्तींना वाकून नमस्कार केला. लालकृष्ण आडवाणी आणि गोपीनाथ मुंडे. त्यावेळी मला त्यांनी विचारलं होतं कोणतं खात पाहिजे. तेव्हा मला बांधकाम खातं देण्यात आलं. आणि त्याच काळात पुणे-मुंबई महामार्गाचं (Pune-Mumbai Highway) काम झाल्याचे नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले.

3600 कोटी रुपयांचं टेंडर रिजेक्ट केलं

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेसाठी (Pune-Mumbai Expressway) रिलायन्सचं 3600 कोटी रुपयांचं टेंडर आलं होतं. मी गोपीनाथ मुंडेंकडे गेलो आणि त्यांना म्हणालो, हे टेंडर फार जास्त आहे. हे दिलं तर आपल्यावर टीका होईल. त्यामुळे आपण हे टेंडर रिजेक्ट करुन, नवीन टेंडर काढायला हवं, असं मला वाटतं. त्यांनी माझ्याकडची सर्व कागदपत्रे तपासली आणि सांगितलं की मी तुझ्या मागे उभा आहे. काळजी करु नको आणि आम्ही एवढं मोठं ते टेंडर रिजेक्ट केलं आणि 3600 कोटी रुपयांचे काम केवळ 1600 कोटी रुपयांत पूर्ण केलं. म्हणजे आजच्या काळातले 20 हजार कोटी रुपये वाचले, असेही गडकरी यांनी म्हणाले.

गडकरी पुढे म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांचं भाजपसाठी मोठं योगदान आहे.
पक्ष मोठा करण्यात गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन (Pramod Mahajan) यांचा सिंहाचा वाटा आहे.
गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यामुळे 1995 ला
आमची सत्ता आली. आपल्या लोकांसाठी जीवाची बाजी लावणारा हा नेता होता.
त्यांनी ऊसतोड कामगारांना न्याय मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title :- Nitin Gadkari | relive the memory of gopinath munde by nitin gadkari

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil | संशोधनाद्वारे विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्याची गरज – चंद्रकांत पाटील

Tax For Illegal Constuction In Pune | बीडीपी, हिलटॉप हिलस्लोप वरील अनधिकृत बांधकामांमुळे ‘शास्तीकर’ माफीचा निर्णय लांबण्याची शक्यता