रस्ते अपघातातील जखमींवर होणार आता मोफत उपचार, प्रायव्हेट हॉस्पीटलमध्ये सुद्धा 1.5 लाखापर्यंत कॅशलेस ट्रीटमेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रस्ते अपघातात जखमी झालेल्यांच्या उपचारासाठी आता आपला खिशातून खर्च करावा लागणार नाही. त्यांना जवळच्या हॉस्पीटलमध्ये मोफत उपचाराची सुविधा मिळेल, मग ते खासगी हॉस्पीटल असो की, नर्सिंग होम असो. नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील रस्ते, परिवहन मंत्रालयाच्या योजनेनुसार लवकरच रस्ते अपघातांमध्ये जखमींना दिड लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध केली जाईल. दुर्घटनेच्या ठिकाणापासून हॉस्पीटल आणि दुसर्‍या ठिकाणी पाठवण्याचा खर्च सुद्धा सरकार करेल.

योजनेत परदेशी पर्यटाकांचा सुद्धा समावेश
रस्ते दुर्घटनेमुळे अपंगत्वाच्या स्थितीत पाच लाख रुपयांच्या भरपाईची तरतुद करण्यात आली आहे. दुर्घटनेत मृत्यूच्या स्थितीत ही रक्कम कुटुंबियांना दिली जाईल. मंत्रालयाने कॅशलेस ट्रीटमेंट योजना बनवली आहे.

यामध्ये परदेशी पर्यटक तसेच यात्रेकरूंचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. योजनेंतर्गत एक्स्प्रेसवे, ग्रीन फील्ड एक्स्प्रेसवे, राष्ट्रीय मार्ग, राज्य मार्ग, जिल्हा तसेच अन्य रस्त्यांवर होणार्‍या अपघातांमधील जखमींचा यामध्ये समावेश असेल. अधिकार्‍यांनी सांगितले की, यामुळे दरवर्षी रस्ते अपघातांना बळी पडणार्‍या 5.5 लाख पैकी जवळपास 4.5 लाख लोकांना फायदा होईल.

अशी होईल वाहन दुर्घटना निधीची व्यवस्था
उपचाराच्या खर्चाची ही तरतूद वाहन दुर्घटना फंडातून केली जाईल. वाहनांचा विमा करणार्‍या जनरल इन्श्युरन्स कंपन्यांच्या कमाईचा एक भाग कॅशलेस उपचारासाठी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय वाहनांकडून टोल टॅक्ससोबत घेतल्या जाणार्‍या रक्कमेचा एक अंश या फंडात दिला जाईल.