ड्रायव्हिंग लायसन्स : गडकरी यांनी म्हटले – ‘आता टेस्ट होणार कठीण, 69 % गुण आवश्यक’

नवी दिल्ली : ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी आता कठीण टेस्ट पास होणे आवश्यक असेल. केंद्रीय रस्ते, परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरूवारी लोकसभेत सांगितले की, 69 टक्के गुण मिळवणार्‍यालाच लायसन्स दिले जाईल. सोबतच चार आणि तीनचाकी वाहने रिव्हर्स घेण्यावर चांगली पकड आवश्यक असेल.

गडकरी यांनी लेखी उत्तरात म्हटले, रस्ते दुर्घटना रोखणे आणि कुशल ड्रायव्हर्सना लायसन्स देण्यासाठी टेस्ट कठीण करण्यात आली आहे. यामध्ये मागील गेयरवाल्या गाड्यांना मागे घेणे, उजवीकडे आणि डावीकडे मर्यादीत जागेत पूर्ण नियंत्रणासह कुशलतेने गाडी मागे घेण्यासारख्या मुद्द्यांवर अर्जदाराची चाचणी घेतली जाईल.