सिंचनासाठी महाराष्ट्राला १ लाख ५५ हजार कोटी: नितीन गडकरी 

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन 
राज्यातील सिंचन प्रकल्पाकरिता केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. राज्यातील ९१ प्रकल्पांसाठी राज्याला १ लाख ५५ हजार कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारपरिषदेत केली. ही मदत बळीराजा संजीवनी योजनेअंतर्गत दिली जाणार आहे.
यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, राज्यातल्या ९१ प्रकल्पांसाठी हा पैसा पुरावाला जाणार आहे. त्यामुळे जवळपास ३ लाख ७७ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल असा दावा गडकरी यांनी परिषदेत केला. प्रधानमंत्री सिंचन योजनेत राज्यातील मोठ्या प्रकल्पांचा  समावेश असल्याचे गडकरी  यांनी सांगितले.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’73e60a04-8a81-11e8-975c-0bbeaa0942be’]
आत्महत्येचे प्रमाण कमी होईल 
केंद्र सरकारकडून राज्याला १ लाख ५५ हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. प्रथमच राज्याला एवढी मोठी रक्कम मिळत आहे. पहिल्यांदाच पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.  या प्रकल्पाच्या पूर्णत्वा नंतर राज्यातील  ४० टक्के जमीन सिंचनाखाली येईल, त्यामुळे शेतकरी आत्महत्या कमी होतील. असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. या निधीमुळे अनेक अर्धवट प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाबाबतचे काम युद्धपातळीवर करण्याचा मानस आहे.  मे पर्यंत यापैकी काही प्रकल्पांमध्ये पाणी साठायला सुरुवात झाली, तर पुढच्या वर्षी आत्महत्यांची प्रकरणे होणार नाहीत असे गडकरी म्हणाले. या निधीचा फायदा धुळे, बुलढाणा, सांगोला, आटपाडी, तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागालाही याचा मोठा फायदा होईल. आता यामुळे महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होईल. असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.
[amazon_link asins=’B01FXJI1OY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’81f98e26-8a81-11e8-8b16-eb14b232c536′]