खुशखबर ! देशातील 16 कोटी लोकांना रोजगार देणार मोदी सरकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील लोकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे कारण मोदी सरकारच्या एका मंत्रालयाकडून तब्बल १६ कोटी लोकांना रोजगार प्राप्त होणार आहे. मोदी सरकारचा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) विभाग येत्या काही वर्षांत एक प्रमुख रोजगार क्षेत्र म्हणून उदयास येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे एमएसएमई मंत्रालय सांभाळत आहेत. त्यांचा दावा आहे की, येणाऱ्या पाच वर्षांत हे क्षेत्र पाच कोटी नवीन रोजगार देणार आहे.

ही रोजगाराची संधी ग्रामीण भागात उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर एमएसएमई विभागाकडून नुकतेच ११ कोटी लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या पद्धतीनं हे मंत्रालय २०२५ पर्यंत १६ कोटी लोकांना नवीन रोजगार मिळवून देण्यास सक्षम राहील.

नितीन गडकरी म्हणाले की, पंतप्रधान मोदी पुढील पाच वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेला ५ ट्रिलियन अमेरिकन डॉलर पर्यंत नेण्यासाठी काम करीत आहेत. यामध्ये एमएसएमई क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

त्यांनी सांगितले की ग्रामीण उद्योगांची वार्षिक उलाढाल सध्या ७५ हजार कोटी रुपये आहे. या वर्षापर्यंत हे एक लाख कोटी रुपयांपर्यंत करण्याचे लक्ष आहे. या पद्धतीनेच येत्या पाच वर्षांत टर्नओवर ही पाच लाख कोटी पर्यंत नेण्याचे मोदी सरकारचे लक्ष्य आहे. तसेच या पाच वर्षात पाच कोटी नवीन रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील.

सध्या एमएसएमई क्षेत्र देशातील जीडीपी च्या २९ टक्के आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे योगदान जीडीपीच्या २९ टक्क्यांवरून ५० टक्क्यांवर वाढवण्याची एमएसएमई मंत्रालयाची इच्छा आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/