‘तो फक्त ट्रेलर होता… पिक्चर अभी बाकी है …’

भंडारा : पोलीसनामा ऑनलाईन – ‘तुम्ही आतापर्यंत जे काही पाहिलं, तो फक्त ट्रेलर होता… पिक्चर अभी बाकी है…” अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज विरोधकांना टोला लगावला विदर्भात गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन झाले. या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, ” भाजपमध्ये कुठलीही घराणेशाही नाही’ असे सांगत गडकरी यांनी कॉंग्रेसला टोला लगावला. ‘आमदार किंवा खासदाराने मागितले, म्हणून त्यांच्या मुलांना तिकीट मिळणार नाही. कार्यकर्त्यांकडून, जनतेकडून ही मागणी झाली पाहिजे’, असे गडकरी म्हणाले. तसेच सत्तेत आल्यापासून आम्ही जनतेसाठी कामे केली आहेत. विदर्भाचा, महाराष्ट्राचा आणि देशाचा चेहराच बदलण्याचे काम आम्ही केले आहे. याचे श्रेय भाजपाला नाही जनतेला आहे. आतापर्यंत तुम्ही जे पाहिले, तो फक्त ट्रेलर होता… पिक्चर अभि बाकी आहे ” असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला .

दरम्यान, नागपूर-भंडारा हा सहा पदरी रस्ता तयार केला जाणार आहे आणि एक हजार कोटी रुपयांचे काम येत्या सहा महिन्यांत सुरू होईल, अशी घोषणा गडकरी यांनी यावेळी केली. गडकरी म्हणाले, “सर्वाधिक आत्महत्या झालेल्या जिल्ह्यात एकूण १०८ प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. यासाठीच्या एकूण निधीपैकी २५ टक्के रक्कम केंद्र सरकार आणि ७५ टक्के रक्कम नाबार्ड देणार आहे. यासाठी एकूण २० हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.”