केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केला ‘विश्वविक्रम’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या कामातून विश्वविक्रम केला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नावावर या विक्रमाची नोंद झाली आहे. यासंबधी स्वत: नितीन गडकरी यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. विश्वविक्रमाची नोंद झाल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विशेष शब्दांमध्ये नितीन गडकरी यांचे अभिनंदन केले आहे.

या विक्रमाबद्दल माहिती देताना गडकरी यांनी सांगितले की, दिल्ली-वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्ग तयार करताना 24 तसांच्या कालावधीत झालेल्या कामामुळे चार विक्रम मोडीत निघाले आहेत. तसेच, देशासाठी पायाभूत सुविधा पूर्वी पेक्षा अधिक वेगाने तयार करण्यात येत आहे. आम्ही केवळ मापदंड घालून दिले नाही तर जागतिक विक्रमही केला आहे.

विश्वविक्रमाची माहिती देताना नितीन गडकरी यांनी सांगितले की, रस्ता निर्माण करण्यासाठी 24 तसांमध्ये PQC चा सर्वाधिक वापर करण्यात आला. 24 तसांत PQC चे सर्वाधिक उत्पादन केले गेले. PQC चा वापराने जेवढा रस्ता तयार केला गेला, तो देखील एक विश्वविक्रम आहे. हे चार मुद्दे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

नितीन गडकरी यांनी विश्वविक्रमाची माहिती दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. फडणवीस म्हणाले, आपला देश व मुंबईसाठी ही मोठी कामगिरी आहे. रस्ते विकास प्रकल्पांच्या या आश्चर्यकारक गतीबद्दल नितीन गडकरीजी तुमचे खूप अभिनंदन, अशा शब्दात फडणवीस यांनी गडकरी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.