‘या’ मराठी भाजप नेत्याला उपपंतप्रधान करा ; भाजप नेत्याचा पक्षाला सल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तीन राज्यात भाजपने पराभव पाहिल्या पासून भाजपच्या अंतर्गत मोदी-शहा जोडीला विरोध व्हायला सुरुवात झाली आहे. अशातच भाजपचे जेष्ठ नेते संघप्रिय गौतम यांनी पक्षाला अजब सल्ला देऊन मोदी आणि अमित शहा यांच्या कपाळाला आट्याच पडल्या आहे. नितीन गडकरी यांना भारताचे उपपंतप्रधान बनवा, राजनाथ सिंह यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनवा, राष्ट्रीय अध्यक्ष, शिवराज सिंह चौहान यांना बनवा आणि योगी आदित्य नाथ यांना धार्मिक कार्य करण्यासाठी मोकळे करा असा सल्ला संघप्रिय गौतम यांनी भाजपला दिला आहे.

संघप्रिय गौतम हे एवढेच बोलून थांबले नाहीत तर त्यांनी अमित शहा यांनी सध्या राज्यसभेच्या कामकाजावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे असे मत व्यक्त केले आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आणि मोठे नेते आहेत. त्याच्या नेतृत्वात पक्ष येत्या निवडणुका लढवू पाहत आहे परंतु येत्या निवडणुकीत मोदी लाट सक्रिय राहण्याचा संभव फारच कमी आहे. हि शक्यता कार्यकर्त्यांना हि माहित आहे. परंतु ते उघड बोलू शकत नाहीत. हे मात्र नाकारता नयेणारे सत्य आहे असे गौतम म्हणाले आहेत.

केंद्र सरकारच्या धोरणावर लोक नाराज आहेत. मोदी सरकारच्या योजना देखील लोकांना मान्य नाहीत. त्याच प्रमाणे आता निवडणुका झाल्या तर भाजप अनेक राज्यात सत्तेतून बाहेर फेकला जाईल. योजना आयोगाचे नाव बदलणे, सीबीआयमध्ये हस्तक्षेप करणे, रिजर्व बँकेच्या कामात अडथळा आणणे या बाबींना सोमोर ठेवून गौतम यांनी भाजपवर टीका केली आहे. उत्तराखंड मध्ये बहुमताने विराजमान झालेले सरकार पाडणे बरोबर नव्हते तर मणिपूर आणि गोव्यात ज्या पध्द्तीने सत्ता बळकावली ती पध्द्त हि चुकीची होती असे गौतम यांनी म्हणले आहे.

दरम्यान या पूर्वी हि भाजपचे राज्यमंत्री दर्जाचे नेते किशोर तिवारी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून गडकरी यांना पंतप्रधान करण्याची मागणी केली होती. जर २०१९ च्या लोकसभा निवडणुका जिंकायच्या असतील तर गडकरींना पंतप्रधान करा कारण त्यांच्या कामा बद्दल लोकांच्या मनात खूप आपुलकी आहे तसेच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक दशका पासूनचे निष्ठावान स्वयंसेवक आहेत असे तिवारी यांनी आपल्या पत्रात म्हणले होते.

मोदी आणि शहा यांच्या विरोधात असणारा भाजप पक्षाचा अंतर्गत गट या जोड गोळीच्या विरोधात कार्यवाही सुरु करण्यासाठी काही तरी ठोस शोधण्याचा प्रयत्न करत होता. ते ठोस कारण तीन राज्यातून गेलेली सत्ता ठरले आहे. मोदींना २०१९ मध्ये सत्ता जरी आली तरी त्यांच्या आणि अमित शहा यांच्या विरोधात उठणारी बंडाळी छाटून काढण्यास तारे वरची कसरत करावी लागणार आहे.