लोकसभेबाबत मला जो निर्णय घ्यायचा आहे तो मी नंतर जाहीर करेलच : राज ठाकरे 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वर्तमान पत्रातून अनेक बातम्या समोर आल्या होत्या की, मी 3 जागा मागितल्या, 2 जागा मागितल्या, यांना भेटले त्यांना भेटले असं सांगितलं जात होतं. परंतु मला जो निर्णय घ्यायचा आहे तो मी नंतर जाहीर करलेच असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे. इतकेच नाही तर, नंतर सांगेन म्हणजे आज सांगेन असे नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. यावेळी त्यांनी जाहीर सभा घेतली. मुंबई येथे ते बोलत होते.
‘चौकीदार चोर है’
यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधानांवर सडकून टीका केली. त्यांना मोदींचा उदो उदो करणाऱ्या त्यांनी नमोरुग्ण  आहेत असे म्हणत टीका केली आहे. इतकेच नाही तर, त्यांनी मी ट्रोलला घाबरत नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना राज यांनी एअर स्ट्राईक आणि युद्धखोरी वक्तव्याचाही समाचार घेतल्याचे दिसून आले. यावेळी ते बोलत असताना मोठ्या संख्येने मनसे सैनिक उपस्थित होते. यावेळी त्यांनी ‘चौकीदार चोर है’ च्या मोठ्या आवाजात घोषणा दिल्या.
मोदी नवाज शरीफांच्या वाढदिवसाला का गेले होते ?
मोदी नवाज शरीफांच्या वाढदिवसाला का गेले होते असा सवालही राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला आणि पंतप्रधानांवर आपली तोफ डागली. इतकेच नाही तर मोदीभक्तांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये असेही ते म्हणाले. मोदी आणि त्यांचे भक्त यांच्यावर राज ठाकरे यांनी सडकून टीका केली. जुनं काहीतरी विसरण्यासाठी नवं काहीतरी घडवलं जात आहे असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला.