… म्हणून टोल भरण्यापासून आयुष्यभर सुटका नाही : नितीन गडकरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयासाठी अनुदान संबंधी बैठक झाली. त्यात नितीन गडकरी यांनी टोलवर आपले मत सांगत त्याचे महत्त्वही सांगितले. जर लोकांना चांगले रस्ते हवे असतील तर त्यांना त्यासाठी पैसे मोजावेच लागतील, असं पहिवहन मंत्री नितीन गडकरींनी म्हटलं आहे. टोल सिस्टीम तशीच राहणार आहे. ती बंद होणार नाही. कारण चांगले रस्ते पुरवण्यासाठी सरकारकडे तेवढे पैसे नाहीत. टोलमधून येणाऱ्या पैशांमधून ग्रामीण आणि डोंगरी भागातील रस्त्यांचे काम करणार आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं.

ज्या भागात टोल घेता येऊ शकतो तेथे टोल घेतला जाईल आणि तो घेतलाच पाहिजे. टोल आयुष्यभर बंद नाही होणार, तो एकवेळ कमी जास्त होऊ शकतो. मीच टोलचा जन्मदाता आहे, असं नितीन गडकरी यांनी यावेळी म्हटलं. त्यामुळे भारतीयांची टोलमधून सुटका नाही हे निश्चित आहे.

५ वर्षात ४० हजार किलोमिटर हायवेचा निर्माण करण्यात आला आहे. रस्ते परिवहन मंत्रालय दिल्ली ते मुंबई असा ग्रीन एक्सप्रेस-वे च्या प्रकल्पावर काम करत आहेत. या एक्सप्रेसवे ने दिल्ली ते मुंबईचा प्रवास १२ तासात करता येणार आहे. हा एक्सप्रेस वे राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यातील आदिवासी भागातून जाणारा असेल. त्यासाठी जमीनीसाठी १६ हजार करोड रुपयांची तरतुद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं.

रस्त्यांसाठी जमीन मिळवण्यासाठी अधिक समस्या येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने यावर समाधान शोधले पाहिजे. तसंच प. बंगाल आणि बिहार या राज्यात रस्त्यांसाठी जमीनी लवकर मिळत नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, जेव्हा २०१४ मध्ये त्यांच्या हातात परिवहन मंत्रालय आले तेव्हा ३.८५ करोड चे प्रोजेक्ट बंद पडले होते. मात्र जेव्हा पासून मोदी सरकार सत्तेत आले आहे. तेव्हापासून बँकांचे ३ लाख करोड वाचले आहेत. तर आता त्यातील ९० टक्के प्रोजेक्टवर मोदी सरकार जोरदार काम करत आहे.

आरोग्यविषयक वृत्त

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या

पावसाळ्यात केसांसाठी ‘हे’ घरगुती ‘मास्क’ !

किडनीला ‘डिटॉक्स’ करण्यासाठी प्या ‘हे’ ३ घरगुती ड्रिंक्स

गर्भावस्थेत प्रवास करताना ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या

तुळशीची पाने उकळत्या दुधामध्ये घालून त्याचा सेवन करणे ‘लाभदायक’

Loading...
You might also like