Nitin Gadkari | नितीन गडकरींच्या कार्यालयात पुन्हा धमकीचा फोन, जयेश पुजारीच्या नावाने धमकी; 10 कोटींची खंडणी मागितली, पोलिसांकडून तपास सुरु

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात (Nagpur Office) सकाळी धमकीचे दोन फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर पोलिसांनी गडकरी (Nitin Gadkari) यांचे कार्यालय आणि त्यांच्या घराची सुरक्षा वाढवली आहे. तसेच फोन करणाऱ्याचा तपास सुरु केला आहे.

नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या नागपूर येथील कार्यालयात जयेश पुजारी (Jayesh Pujari) या गुंडाच्या नावाने हा धमकीचा फोन आला असून 10 कोटींची खंडणी (Extortion) मागितली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा फोन (Threatening Phone Call) आला. दोन वेळा फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने जयेश पुजारीच्या नावाने फोन केला. त्याने दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली. एकापाठोपाठ एक धमकीचे फोन आल्याने कर्मचाऱ्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली.

दरम्यान, यापूर्वी देखील नितीन गडकरी यांना धमकीचे फोन आले होते. जयेश पुजारी या नावानेच हे फोन आले होते.
या प्रकरणी पोलिसांनी बंगळुरला जाऊन चौकशी केली होती. मात्र त्याने हे फोन केले नसल्याची माहिती देण्यात
आली होती. आता या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी नितीन गडकरींच्या कार्य़ालायात चौकशी करत आहेत.

Web Title :- Nitin Gadkari | threatening phone calls again in nitin gadkaris office in nagpur 10 crore ransom demanded

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mukesh Chhabra | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या नैराश्याबद्दल मुकेश छाबरा यांनी केला मोठा खुलासा; म्हणाले….

Beed Crime News | क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून पतीकडून पत्नीची डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या

Maharashtra Local Body Election | ‘तारीख पे तारीख’, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत सुनावणी पुन्हा पुढे ढकलली