Nitin Gadkari | ‘आम्ही मंत्री आहोत, त्यामुळे कायदा तोडण्याचा अधिकार’ – नितीन गडकरी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Nitin Gadkari | विकासकामे धडाडीने पूर्ण करण्यासाठी आणि नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कोणतीही जोखीम स्वीकारण्यासाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज आणखी एक लक्षवेधक किस्सा एका कार्यक्रमात सांगितला. या कार्यक्रमात गडकरी यांनी म्हटले की, गरिबांचे कल्याण करण्यासाठी कोणताच कायदा आडवा येणार नाही. त्यासाठी 10 वेळा कायदा तोडावा लागला तरी चालेल, तो तोडला पाहिजे असे महात्मा गांधींनी सांगितले होते. त्यामुळे लोकांच्या हितासाठी कायदा तोडण्याचा आमचा अधिकार आहे. आम्ही मंत्री आहोत, त्यामुळे कायदा तोडण्याचा अधिकार आहे, असे गडकरी म्हणाले.

 

महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सच्या नागपूर (Maharashtra University of Health Sciences Nagpur) शाखेकडून मल्टी डिस्प्लेनरी मल्टी मॉडेल रिझल्टच्या (Multivariable Multimodel Results) अंतर्गत आदिवासींच्या आरोग्याकरिता ब्लॉसम नावाच्या प्रकल्पाचे (Blossom Project) नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन केले. यावेळी गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले की, सरकार अधिकार्‍यांच्या मताने नाही तर आमच्या मताने चालेल. आम्ही जसे म्हणू त्याला अधिकार्‍यांनी ’यस सर’ म्हणत अंमलबजावणी केली पाहिजे.

 

गडकरी पुढे म्हणाले की, 1995 मध्ये राज्यात मनोहर जोशी (Manohar Joshi) मुख्यमंत्री असताना गडचिरोली (Gadchiroli) आणि मेळघाट (Melghat) मध्ये 2 हजार आदिवासी बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची महितींसमोर आली होती. त्यावेळी त्या भागात 450 गावांना रस्ते नव्हते आणि रस्ते बांधण्यासाठी वन विभागाचे कायदे अडसर ठरत होते. रस्ते नसल्याने विकास होत नव्हता. त्यावेळी मी माझ्या पद्धतीने ती समस्या सोडविली होती.

गडकरी (Nitin Gadkari) पुढे म्हणाले, गरिबांचे कल्याण करण्यासाठी कोणताच कायदा (Law) आडवा येणार नाही.
त्यासाठी 10 वेळा कायदा तोडावा लागला तरी चालेल, तो तोडला पाहिजे असे महात्मा गांधींनी सांगितले होते.
त्यामुळे लोकांच्या हितासाठी कायदा तोडण्याचा आमचा अधिकार आहे.
आम्ही मंत्री आहोत, त्यामुळे कायदा तोडण्याचा अधिकार आहे.
प्रशासकीय अधिकार्‍यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, तुम्ही म्हणाल तसे सरकार चालणार नाही.
तर सरकार आम्ही म्हणू तसे चालेल. तुम्ही फक्त ’यस सर’ म्हणायचे आणि आम्ही दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करायची.

 

Web Title :- Nitin Gadkari | we are ministers so we have the right to break the law nitin gadkari

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा