Nitin Gadkari | जेव्हा गडकरींवर नाराज झाले होते बाळासाहेब आणि धीरूभाई अंबानी ! केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले – ‘कसे रिलायन्सचे टेंडर रिजेक्ट करून वाचवले होते 2000 कोटी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nitin Gadkari | गुंतवणुकदारांसोबतच्या बैठकीत (meeting with investors) रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी (Road Transport Minister Nitin Gadkari) यांनी 1995 चा एक किस्सा सांगितला. गडकरी यांनी म्हटले की, रिलायन्स (Reliance) ची एक निविदा रद्द केल्याने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांच्यासह धीरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani) त्यांच्यावर नाराज झाले होते. परंतु त्यांनी कुणाचाही विचार केला नाही. त्यांच्या निर्णयाने सरकारचे 2 हजार कोटी रुपये वाचले. (Nitin Gadkari)

 

गुंतवणुकदारांसोबतच्या बैठकीत गडकरी यांनी सांगितले की, 1995 मध्ये ते राज्यमंत्री होते. मुंबई-पुणे एक्सप्रेससाठी (mumbai pune expressway) रिलायन्सचे (reliance) एक टेंडर आले होते. त्यांनी ते रिजेक्ट केले. त्यांच्या या पावलाने केवळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब आणि रिलायन्सचे तत्कालीन सर्वेसर्वाच नव्हे, तर त्यांचे मुख्यमंत्री सुद्धा नाराज झाले होते. त्यांनी गडकरींना विचारले की तुम्ही असे काम का केले. तेव्हा गडकरींनी सांगितले की, आपण त्या प्रोजेक्टसाठी लोकांकडून पैसे जमवू. परंतु त्यांच्या या बोलण्यावर सर्व लोक त्यांना हसत होते. (Nitin Gadkari)

 

तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी (Chief Minister Manohar Joshi) यांनी त्यांना म्हटले होते की, जे बोलला आहात ते करून दाखवा.
गडकरी यांनी सांगितले की, त्यानंतर महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (Maharashtra State Road Development Corporation – MSRDC)
ची स्थापना करण्यात आली. आम्ही गुंतवणुकदारांकडे लॅपटॉप घेऊन गेलो. त्यांना योजनेबाबत सांगितले.
त्यावेळी आम्हाला गुंतवणुकदारांकडे जावे लागत होते. आजचा काळ वेगळा आहे गुंतवणुकदार आमच्याकडे येऊन योजना स्वीकृत करण्याची विनंती करतात.

गडकरी यांनी सांगितले की, रिलायन्सने त्या प्रोजेक्टसाठी 3600 कोटी रुपयांची निविदा दिली होती.
परंतु त्यांनी तो प्रोजेक्ट 1600 कोटीत पूर्ण करून दाखवला. म्हणजे सरकारचे थेट दोन हजार कोटी रुपये वाचवले.
गडकरी यांनी सांगितले की, रतन टाटा (Ratan Tata) यांनी त्यांना म्हटले होते की, तुम्ही तर आमच्यापेक्षा स्मार्ट निघालात.

 

त्यांचे म्हणणे होते की, आम्हाला सुद्धा वाटत नव्हते की, इन्फ्रा प्रोजेक्टसाठी बाजारातून पैसे काढता येऊ शकतात.
आजच्या बैठकीत त्यांनी गुंतवणुकदारांना म्हटले की, भारतात दोन गोष्टींबाबत कोणतीही शंका नाही.
एक म्हणजे लोकसंख्या वाढणे आणि आणि दुसरी आटोमोबाईल सेक्टरची वाढ.

 

Web Title :- Nitin Gadkari | when balasaheb thackeray and dhirubhai ambani got angry with nitin gadkari the union minister said how 2000 crores were saved by rejecting reliances tender

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Omicron Variant | पुण्याच्या ग्रामीण भागात ओमायक्रॉनची ‘एन्ट्री’, जून्नरमध्ये 7 रुग्ण आढळले

Pune Corona | ग्रामीण भागात ओमायक्रॉनच्या एन्ट्रीने चिंता वाढली, पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 73 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘गेल्या 24 तासात कोरोना’च्या 902 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी