आंबेडकरांच्या ‘या’ वक्तव्यामुळे काँग्रेसच्या युतीची शक्यता धूसर

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन- भाजप नेते नितीन गडकरी आरएसएसचे पुढील पंतप्रधान असतील. तसेच काँग्रेसचे विचार आरएसएसशी मिळतेजुळते आहेत असे विधान भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज मंगळवारी नागपूर येथे केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे भारीप आणि काँग्रेस युतीची शक्यता धूसर झाली आहे.

काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात प्रस्तावित महाआघाडीत भारिप बहुजन महासंघाला समाविष्ट करू इच्छिते. पण आंबेडकरांनी काँग्रेसला वाकुल्या दाखवत एमआयएमसोबत वंचित बहुजन विकास आघाडी तयार केली आहे.

या आघाडीसाठी आंबेडकरांनी १२ जागा मागितल्या आहेत, मात्र काँग्रेस त्यासाठी तयार नाही. एमआयएमसारख्या धार्मिक संघटनेला महाआघाडीत थारा नाही, असंही काँग्रेसने म्हटलं आहे. आंबेडकर यांनी आज केलेल्या विधानामुळे काँग्रेस सोबतची युती संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे.

#Surgicalstrike2 : ५० बातम्या एकाच क्लिक वर