Nitin Gadkari | देशात पेट्रोल-डिझेल बंद होणार?; जल, वायू अन् ध्वनी प्रदूषणाबाबत नितीन गडकरींचे मोठे वक्तव्य

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी जल, वायू अन् ध्वनी प्रदूषणाबाबत मोठे भाष्य केले आहे. पर्यावरणासाठी मी पेट्रोल-डिझेल (Petrol- Diesel) बंद करण्यासाठी ताकदीने लढत आहे. इलेक्ट्रिक कार, स्कूटर, रिक्षा, ई-बस आल्यात, माझ्याकडे दिल्लीत हायड्रोजनवर चालणारी कार आहे. पाण्यातून निघणाऱ्या हायड्रोजनने (Hydrogen) कार चालते. मर्सिडिजपेक्षाही चांगली धावते. माणसाचे आरोग्य बिघडवण्याचे मुख्य कारण वायू, जल आणि ध्वनी प्रदूषण आहे असे स्पष्ट मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मांडले आहे. नागपूरमध्ये एका खासगी कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हे मत मांडले आहे.

 

तसेच नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले सध्या देशात फक्त पोलीस, रुग्णवाहिकांना सायरन वाजवण्याचे अधिकार आहेत. आता मी एक कायदा बनवत आहे. ज्यामुळे ते सायरनही बासरीसारखे वाजणार आहे. तसेच जल, वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखायला हवे. आता नाग नदीसाठी (Nag River) 2400 कोटी मंजूर करण्यात आले आहे. आपले शहर जल, वायू, आणि ध्वनी प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे.

 

आपल्या देशात रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे.
दरवर्षी 5 लाख अपघात आणि दीड लाख मृत्यू होतात. मृतांमध्ये उच्चशिक्षित, डॉक्टर, युवकांची संख्या 60 टक्के आहे.
त्यामुळे रस्ते अपघात, पर्यावरण यासाठी आपली शिक्षण संस्था,
सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेऊन समाजाचं प्रशिक्षण आणि प्रबोधन करायला हवे असे नितीन गडकरी म्हणाले आहेत.
तसेच समाजाने पुढकार घेतल्याशिवाय हा कार्यक्रम होणार नाही असेदेखील नितीन गडकरी म्हणाले आहेत.

 

Web Title :- Nitin Gadkari | will petrol diesel be stopped in the country nitin gadkaris speech on water air and noise pollution

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | वानवडी गावात टोळक्याचा धुडगूस; वाहनांवर दगडफेक करुन केली नासधुस

Dhule Accident News | अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी अंत

Uddhav Thackeray Rally in Malegaon | उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी एकनाथ शिंदेचा धक्का, 3 माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश