नितीन गडकरी यांचा रक्‍तदाब वाढल्याने त्यांची प्रकृती बिघडली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांची प्रकृती बिघडली आहे. नितीन गडकरी सध्या शिमला येथे असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी दिल्ली येथील डॉक्टरांचे पथक शिमला येथे रवाना करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी राहता येथील महायुतीच्या सभेत त्यांना अचानक भोवळ आली होती.

नितीन गडकरी यांची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांचे एक पथक तातडीने शिमला येथे रवाना करण्यात आले. राहता येथील सभेत नितीन गडकरी यांचा रक्तदाब अचानक कमी झाल्याने त्यांना स्टेजवर भोवळ आली होती. या ठिकाणी त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. राहता येथील सभेदरम्यान त्यांना कमालीचा थकवा जाणवत होता. घशाला कोरड पडत होती. ते भाषण करण्यासाठी उठले असता त्यांना अचानक भोवळ आली. त्यांना तातडीने लिंबू-साखरपाणी देण्यात आले. थोडे बरे वाटल्यानंतर ते शिर्डीच्या दिशेने रवाना झाले होते.

नितीन गडकरी यांना काही महिन्यांपूर्वी एका पदवीदान समारंभात ही अशाच प्रकारची भोवळ आली होती. नितीन गडकरी सध्या शिमला येथे असून त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांची प्रकृती बिघडली. त्यांची प्रकृती बिघडल्याचे समजताच दिल्ली येथील डॉक्टरांचे पथक तातडीने शिमला येथे रवाना झाले आहे.

दरम्यान, नितीन गडकरी यांनी दोन तासांपुर्वीच त्यांच्या twitter वरून गडचिरोली येथील नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवांनाना भावपुर्ण श्रध्दांजली वाहिली असून नक्षलवाद्यांना त्यांनी केलेल्या कृत्याची किंमत चुकवावी लागेल असे त्यांनी म्हटले आहे.

महत्वाचे – नितीन गडकरी यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्‍त समोर आल्यानंतर काही मिनिटानंतर गडकरी यांच्या कार्यालयाकडून twitter वरून माहिती देण्यात आली आहे की, गडकरी यांची प्रकृती उत्‍तम आहे. शिमला येथे डॉक्टरांनी त्यांचे रूटीन चेकअप केले आहे.
You might also like