नितीन गडकरी यांची प्रकृती उत्‍तम : गडकरींच्या कार्यालयाची माहिती

नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा रक्‍तदाब वाढल्याने त्यांची प्रकृती बिघडली असल्याचे वृत्‍त समोर येताच गडकरी यांच्या कार्यालयातून त्यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. गडकरी यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, गडकरी यांची प्रकृत्‍ती उत्‍तम असुन त्यांचे शिमला येथे डॉक्टरांनी रूटीन चेकअप केले आहे.

गडकरी यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यासंदर्भातील बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळल्या. त्याची दखल घेत गडकरी यांच्या कार्यालयाने लागलीच त्याबाबत स्पष्टीकरण दिले असुन गडकरी यांची प्रकृती सध्या उत्‍तम असल्याचे सांगण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शिर्डी लोकसभा मतदार संघातील एका सभेमध्ये गडकरी यांना भोवळ आली होती. त्या घटनेला काही दिसव होत नाही तोवर शिमला येथुन गडकरींची प्रकृती बिघडल्याचे वृत्‍त आल्याने खळबळ निर्माण झाली होती. मात्र, गडकरी यांच्या कार्यालयाने आता गडकरी यांच्या प्रकृतीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सध्या गडकरींची प्रकृती उत्‍तम आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like