थेऊर उपसरपंचपदी नितीन कुंजीर यांची बिनविरोध निवड

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असलेल्या थेऊर थेऊरगावच्या उपसरपंच पदी नितीन दिलीप कुंजीर यांची बिनविरोध निवड झाली. येथील ग्रामपंचायत कार्यालयात गावच्या सरपंच संगीता तारु यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब कांबळे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

काही दिवसापूर्वी उपसरपंच विलास कुंजीर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे, माजी उपसरपंच आप्पासाहेब काळे, शहाजी जाधव, माजी सरपंच छाया काकडे, सुरेखा कुंजीर, ग्रामपंचायत सदस्य मीनाक्षी कांबळे, पल्लवी साळुंखे, दिपाली घुगे, संगीता गावडे, राहुल कांबळे,माजी पंचायत समिती सदस्य काळुराम कांबळे, तसेच सुदाम गावडे, रामभाऊ कुंजीर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, श्रीनिवास कुंजीर, तुकाराम चव्हाण, सुरेश चव्हाण, अर्जुन देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.