Nitin Landge Bribe Case | पिंपरी पालिकेतील स्थायी समितीवरील अ‍ॅन्टी करप्शनच्या कारवाईबद्दल अजित पवार म्हणाले…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Nitin Landge Bribe Case | होर्डिंगच्या टेंडरची वर्क ऑर्डर काढण्यासाठी 10 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे (PCMC) स्थायी समितीचे अध्यक्ष (Standing Committee Chairman) अ‍ॅड. नितीन लांडगे (Nitin Landge Bribe Case) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली होती. दरम्यान, आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते (NCP) अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी म्हणाले, जनतेच्या कररुपातून आलेला हा पैसा असतो, त्यावर असा डल्ला मारण्यासाठी कोणी पुढाकार घेत असतील तर हे पिंपरी-चिंचवडचे दुर्दैव आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

अजित पवार पुढे म्हणाले, कोणी कोणाचा राजीनामा घ्यावा हा त्या-त्या पक्षाचा संबंध आहे. पण महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं. हे शहरवासीय उघड्या डोळ्याने हे पाहतायेत. भाजपची (BJP) महापालिकेत सत्ता असताना हा प्रकार घडला आहे. वास्तविक पाहता मी देखील या शहराचे वीस वर्षे नेतृत्व केले आहे. परंतु अशा गोष्टी घडू दिल्या नाहीत. त्यातूनही यदाकदाचित असे प्रकार नजरेस आले तर मी संबंधितांवर कडक कारवाई करताना मागे पुढं पाहिलं नाही. कारण जनतेच्या कररुपातून (Tax) आलेला हा पैसा असतो, त्यावर असा डल्ला मारण्यासाठी कोणी पुढाकार घेत असतील तर हे पिंपरी-चिंचवडचे दुर्दैव असल्याची टीका त्यांनी भाजपवर केली.

अजित पवार पुढे म्हणाले, कोणीही असो, चौकशीत ते समोर येईल. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही,
तोपर्यंत यावर अधिक भाष्य करणं योग्य होणार नाही.
पण ते राष्ट्रवादीशी संबंधित असतील तर आम्ही योग्य ती कारवाई नक्की करु, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

Web Title : Nitin Landge Bribe Case | ajit pawar on action of acb on standing committee of pimpri chinchwad corporation