Nitin Landge Bribe Case | होर्डिंग लाच प्रकरण : ‘पैसे वर सोळा जणांना द्यावे लागतात’ ! टक्केवारी बाबतच्या आदेशाचे संभाषण ‘रेकॉर्ड’; जाणून घ्या कोर्टातील युक्तीवाद

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Nitin Landge Bribe Case | होर्डिंग उभारण्याकरिता ‘वर्क ऑर्डर’च्या करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यासाठी एक लाख 18 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (pimpri chinchwad corporation) अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे यांनी तक्रारदार ठेकेदाराला टक्केवारीचे पैसै ‘वर सोळा जणांना द्यावे लागतात’ असे सांगितल्याचे तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे (standing committee chairman adv nitin landge) यांनीच पिंगळे यांना टक्केवारी तीनऐवजी दोन करा, असे आदेश दिल्याचे संभाषण व्हॉईस रेकॉर्डवर रेकॉर्ड झाले आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील रमेश घोरपडे (Public Prosecutor Ramesh Ghorpade) यांनी गुरुवारी न्यायालयात (Pune Crime) केला. हे एक प्रकारचे मोठे रँकेट असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

यामध्ये कोण कोण सामील आहे याचा तपास करणे गरजेचे असल्याचे ॲड. घोरपडे (Public Prosecutor Ramesh Ghorpade) यांनी आरोपींना चार दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने लांडगे यांच्यासह पिंपरी चिंचवड महापालिकेतील (pimpri chinchwad corporation) पाच जणांना 21 आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी हा आदेश दिला.

स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, त्यांचा पीए ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (वय 56, रा. रामनगर सोसायटी गव्हाणेनगर भोसरी), अरविंद भीमराव कांबळे ( शिपाई, रा. भीमनगर पिंपरी), राजेंद्र जयवंत शिंदे
(संगणक आॅपरेटर रा. जय मल्हार, थेरगाव वाकड) आणि विजय शंभुलाल चावरिया (लिपीक, रा.धर्मराजनगर) यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
तक्रारदार हे जाहिरात ठेकेदार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेडील 26 वेगवेगळ्या जागांमध्ये होर्डिंग उभारण्यासाठी त्यांनी निविदा भरल्या होत्या.

 

2019 व 2020 च्या निविदा मंजूरही झाल्या. मात्र वर्क ऑर्डर निघाली नसल्याने त्यांनी
स्थायी समितीचे अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे यांच्याशी संपर्क केला असता
त्यांनी बोली रकमेच्या बीड अमाऊंटच्या 3 टक्के रक्कमेनुसार 10 लाख रूपयांची मागणी केली.
तडजोडीअंती 6 लाख रूपयांचे देण्याचे ठरले. त्यातील 1 लाख 18 हजार रूपयांची रक्कम पहिल्या टप्प्यात देण्याचे ठरले आणि उर्वरित रक्कम वर्क ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर देण्याचे ठरले.
मात्र 1 लाख 18 हजार रूपयांची रक्कम पिंगळे यांनी स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आणि पाच जणांना अटक केली.
गुरूवारी ( दि.19) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
या सर्व गुन्हयाचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकील ॲड रमेश घोरपडे यांनी केली.

पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (ACB SP Rajesh Bansode), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav), अपर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा (Addl SP suhas nadgouda) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सीमा मेहेंदळे, श्रीहरी पाटील, पोलीस निरीक्षक गिरीश सोनवणे, हवालदार सरिता वेताळ, अश्यापक इनामदार, अंकुश माने, पोलीस अंमलदार अविनाश इंगुळकर, चंद्रकांत कदम यांनी प्रत्यक्ष सापळा कारवाई यशस्वी केलेली आहे.

 

Web Title : Nitin Landge Bribe Case | Hoarding bribery case: ‘Sixteen people have to pay money’! ‘Record’ the conversation of the order regarding the percentage; Learn court arguments

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | एक कोटीच्या फसवणूक प्रकरणी जयदिप लडकत विरूध्द गुन्हा दाखल

Pune Crime | पुणे पोलिस आयुक्तालयाच्या गेटवर पेटवून घेतलेल्याचा मृत्यू

PM Modi | पीएम मोदी सध्या एकवेळ भोजन करत आहेत, स्वत:च सांगितले कारण; पहा व्हिडिओ