Nitin Landge Bribe Case PCMC | स्थायी समितीच्या माध्यमातून जनतेच्या पैशाचा अपहार; चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा – आम आदमी पार्टीची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Nitin Landge Bribe Case PCMC | निविदा मंजुर करायला स्थायी समिती अध्यक्ष ३ टक्के रक्कम घेत असल्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष (Nitin Landge Bribe Case PCMC ) कार्यालयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छाप्यानंतर उघडकीस आला असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने (aam aadmi party) केला आहे. परंतू यानंतरही भ्रष्टाचारमुक्तीची ओरड करणारे भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) गप्प आहेत. स्थायी समितीच्या माध्यमातून पक्षनिधी गोळा करण्यासाठी जनतेच्या पैशाचा अपहार केला जात असून पाटील व फडणवीस यांनी याप्रकरणी भुमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.

आम आदमी पार्टीचे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत (Aam Aadmi Party’s Pune City District President Mukund Kirdat) यांनी यासंदर्भातील निवेदन प्रसिद्धीला दिले आहे. त्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा मारून स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील पाचजणांना लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणात लाचेच्या रकमेपेक्षा अधिक रक्कम कार्यालयात मिळाल्याचे समोर येते आहे. त्या अर्थी ती दिवसभरातील इतर टक्केवारी आहे असे मानायला जागा आहे. कंत्राटदाराला तब्बल ३ टक्के रक्कम मागितली गेली होती. म्हणजे ३.५ कोटीच्या या टेंडर मध्ये तीन टक्के वाटा हा स्थायी समिती अध्यक्ष घेतात असा सर्वसाधारण रिवाज असावा अशी जनतेच्या मनात शंका आहे.
त्यात चर्चेअंती दोन टक्के रकमेवर सौदा ठरला असेही कळते आहे. हे भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे उघडे झालेले टोक आहे!
यातून उघड झालेल्या टक्केवारी वरून भ्रष्टाचारात जनतेच्या पैश्याचा किती अपहार होतो आणि या स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी एवढी चढाओढ का असते हे स्पष्ट होते.

या शिवाय दुसरी बाब म्हणजे या कोरोना काळातील सर्वच प्रकरणात भाजपा सदस्य व राष्ट्रवादी सदस्य एकमुखाने सर्व प्रस्ताव मान्य करत असल्याचे चित्र जनतेला गेले काही महिने दिसत होते.
त्यामुळे या सर्व प्रकरणात राष्ट्रवादीला सुद्धा विश्वासात घेतले गेले होते का?
पिंपरीचिंचवड साठी काळिमा ठरणार्‍या प्रकरणाबाबत राष्ट्रवादीचे अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजपा चे जेष्ठ नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील गप्प का?
चंद्रकांत पाटील यांनी भाजप ला पिंपरी चिंचवड मधून किती निवडणूक निधी मिळतो व कुणाकडून मिळतो हेही स्पष्ट करावे.
पिंपरी चिंचवड मधील सत्ताधारी भाजप हे आधीच्या सत्ताधार्‍यांपेक्षा वेगळे कसे हे पण सांगावे.
तसेच नितीन लांडगे व सर्व स्थायी समिती तातडीने बरखास्त करावी अशी मागणीही किर्दत यांनी केली आहे.

Web Title :- Nitin Landge Bribe Case PCMC | Embezzlement of public money through standing committees; Chandrakant Patil, Devendra Fadnavis should disclose – Aam Aadmi Party’s demand

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tata Steel Company | टाटा स्टीलमध्ये काम करणार्‍यांसाठी खुशखबर ! कंपनीने केली एकुण 270.28 कोटींच्या बोनसची घोषणा

RBI New Guideline on Bank Lockers | बँक लॉकरसाठी RBI ची नवीन गाईडलाईन, चोरी झाल्यास 100 पट मिळेल भरपाई; जाणून घ्या

Health Tips | दिवसा नव्हे, रात्री अंघोळ केल्याने होतात जबरदस्त फायदे; निद्रानाश, अ‍ॅलर्जी, मसल्स क्रॅम्पपासून मिळतो दिलासा