Nitin Landge Bribe Case | अ‍ॅन्टी करप्शन विभागानं न्यायालयात दिली माहिती, म्हणाले – ‘ते सोळा जण म्हणजेच स्थायी समितीचे 16 सदस्य’ ! त्यांच्याकडे चौकशी करणे बाकी असून…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Nitin Landge Bribe Case | होर्डिंगच्या टेंडरची वर्क ऑर्डर काढण्यासाठी दहा लाच रूपयांची लाच मागितल्याप्रकरणात (Nitin Landge Bribe Case) ते 16 जण स्थायी समितीचे सदस्य (PCMC standing committee members) असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्या 16 लोकांची चौकशी होत नाही, तोपर्यंत अटक आरोपींना जामीन देण्यात येवू नये. कारण तोपर्यंत तपास पुर्ण होणार नाही, असा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील रमेश घोरपडे (Public Prosecutor Ramesh Ghorpade) यांनी शुक्रवारी केला. या गुन्ह्यात अटक केलेल्या पाचही आरोपींच्या जामीन अर्जावर दोन्ही पक्षांचा युक्तीवाद पुर्ण झाला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. अ‍ॅन्टी करप्शन विभागाने ते 16 जण म्हणजे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे 16 सदस्य असल्याचं अगदी स्पष्टच न्यायालयात सांगितलं (रिमांड रिपोर्ट) आहे. त्यामुळे अ‍ॅन्टी करप्शन आता स्थायीच्या 16 सदस्यांकडे कसून चौकशी करणार हे स्पष्ट झालं आहे. तपासाबाबतच्या आणखी काही महत्वाच्या गोष्टी देखील अ‍ॅन्टी करप्शननं (anti corruption bureau) न्यायालयात लेखी स्वरूपात (रिमांड रिपोर्ट) सांगितल्या आहेत.

जामीन अर्जावर सोमवारी (ता. ३०) निकाल देण्यात येणार आहे. या प्रकरणात
स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे standing committee chairman adv nitin landge (वय 50, रा. भोसरी),त्यांचा पीए ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (वय 56, रा. भोसरी), शिपाई अरविंद भीमराव कांबळे
(वय 50, रा. भीमनगर, पिंपरी), संगणक ऑपरेटर राजेंद्र जयवंत शिंदे (वय 51, रा. वाकड)
आणि लिपिक विजय शंभुलाल चावरिया वय 38, रा. धर्मराजनगर) यांना अटक करण्यात आली आहे. न्यायलयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर लांडगे यांच्यावतीने अ‍ॅड. प्रताप परदेशी (adv pratap pardeshi) आणि अ‍ॅड. गोरक्षनाथ काळे (adv gorakshnath kale) यांनी तर उर्वरीत
आरोपींतर्फे अ‍ॅड. विपुल दुशिंग (Add. Vipul Dushing), अ‍ॅड. कीर्ती गुजर (Adv. Kirti Gujar),
अ‍ॅड. संजय दळवी (Adv. Sanjay Dalvi) यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास पुर्ण झाला आहे. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा,
असा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला.

 

या अर्जाला ॲड. घोरपडे यांनी विरोध केला. गुन्ह्याचा तपास प्राथमिक स्तरावर असून तपासा दरम्यान ते 16 जण कोण आहेत हे स्पष्ट झाले आहे.
ते 16 जण हे सभासद असून, त्यांच्याकडे चौकशी करणे गरजेचे आहे. त्यांच्याकडील चौकशी होत नाही तोपर्यंत या पाच जणांना जामीनावर सोडू नये.
गुन्ह्याच्या तपासी अधिका-यांना तपास करण्यासाठी पुर्ण संधी आणि वेळा दिला गेला पाहिजे.
आरोपींनी सर्वांनी एकत्र मिळून काम केले आहे. त्यामुळे गुन्ह्यात कोणाचा सहभाग नाही,
असे म्हणता येणार नाही. जर या पाच जणांना जामीन दिल्यास ते तपासात ढवळाढवळ करण्याची
शक्यता नाकारया येत नाही. तसेच या प्रकरणाचा समाजावर काय परिणाम होईल याचा देखील विचार केला जावा.
त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तीवाद अ‍ॅड. घोरपडे यांनी केला.
दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेत या जामीन अर्जावरील निकाल 30 ऑगस्टपर्यंत राखून ठेवला आहे.

पिंगळे याने तक्रारदार ठेकेदाराला टक्केवारीचे पैसै वर सोळा जणांना द्यावे लागतात असे
सांगितले आहे. गुन्ह्याच्या पडताळणीमध्ये ते 16 सदस्य स्थायी समितीचे सदस्य असून
त्यांकडे गुन्ह्याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (anti corruption bureau pune) न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

 

Web Title : Nitin Landge Bribe Case | The Anti-Corruption Department informed the court, saying – ‘Those sixteen are 16 members of the Standing Committee’! They have yet to be investigated

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Income Tax Return | ITR न भरल्याने तुम्हाला द्यावा लागतोय जास्त TDS? मग जाणून घ्या ही समस्या कशी सोडवावी?

Pune Crime | पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून मध्यरात्री जुगार अड्डयावर छापा ! 27 जणांवर कारवाई तर हुक्क्यासह 12.5 लाखाचा मुद्देमाल जप्त

EPFO | ‘पीएफ’च्या खातेधारकांनी व्हावे सावध, 4 दिवसात केले नाही ‘हे’ काम तर होईल मोठे नुकसान; जाणून घ्या