Nitin Manmohan Passed Away | बॉलिवूडवर शोककळा ! प्रसिद्ध चित्रपटाचे निर्माते नितीन मनमोहन यांचं निधन

पोलीसनामा ऑनलाईन : हिंदी सिनेसृष्टीतून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितीन मनमोहन (Nitin Manmohan Passed Away) यांचे आज दुःखद निधन झाले आहे. नितीन मनमोहन यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र ते उपचारांना प्रतिसाद देत नसल्यामुळे त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू (Nitin Manmohan Passed Away) झाला.

निर्माते नितीन मनमोहन यांना 3 डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना मुंबईतील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नितीन मनमोहन हे बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मनमोहन यांचे सुपुत्र होते. नितिन मनमोहन यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये अनेक मोठ्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

यामध्ये बोल राधा बोल, लाडला, दस या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती.
तसेच सलमान खानच्या प्रसिद्ध अशा रेडी चित्रपटाची निर्मिती देखील नितिन मनमोहन यांनी केली होती.
नितिन मनमोहन यांच्या निधनानंतर अनेक बॉलीवूड कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Web Title :- Nitin Manmohan Passed Away | bollywood film producer nitin manmohan passes away

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | शिंदे गट शिवसेना भवनाचा ताबा घेणार? संजय राऊत म्हणाले -‘एक बाप असेल तर…’

Election Commission Of India | मतदान प्रक्रियेत होणार मोठा बदल; आता देशात कुठेही करता येणार मतदान