मंत्री नितीन राऊत याचं आवाहन ! …तर वीज ग्राहकांनी स्वतः मीटर रीडिंग पाठवावे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्य शासनाने राज्यात कठोर निर्बंध लागू केले आहे. वीज बिलाबाबत अशा काळात रीडिंग न घेता बिले पाठवण्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या आहेत.आणि ग्राहकांच्या तक्रारींही वाढल्या आहे. संख्याही शक्यतो मीटर रीडिंग घेऊनच वीज बिले पाठवावीत. कोरोनामुळे काही वेळा महावितरणला रीडिंग घेणे शक्य होत नसल्याने ग्राहकांनी जर मोबाईल अ‍ॅपद्वारे रीडिंग पाठवले, तर त्यांना रीडिंगनुसार बिल उपलब्ध करून देता येईल. असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले आहे. याबाबत त्यांनी मंत्रालयात वीज बिल आणि थकबाकी यासंदर्भात बैठक घेतली.

नितीन राऊत म्हणाले, कोरोनाचा पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांनी स्वतः मीटर रीडिंग पाठवून तसेच वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या दुर्दैवी घटना घडत असून, त्या खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा देत ग्राहकांना ऑनलाइन व मोबाईल अ‍ॅपद्वारे तक्रार करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने तक्रार करता येणार नाही किंवा मोबाइल अ‍ॅपचा वापर करू शकत नाही, त्यांच्यासाठी स्थानिक कार्यालयात ऑफलाइन तक्रारी नोंद करून घेण्याची व्यवस्था करावी,असे राऊत यांनी सांगितले आहे.

या दरम्यान, महावितरणची थकबाकी हे भाजपचेच पाप आहे. भाजपची सत्ता असताना त्यांनी हेतुपुरस्सरपणे केलेल्या गैरव्यवस्थापनामुळे महावितरणवर थकबकीचा डोंगर उभा राहिला आहे. प्रचंड थकबाकी वाढवून महावितरणचे खासगीकरण करण्याची रणनीती भाजपने आखली होती. परंतु, आम्ही ही थकबाकी वसूल करून खासगीकरणाचे हे संकट टाळण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे अस्वस्थ झालेले भाजपचे नेते ठिकठिकाणी महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना लक्ष्य करीत आहेत, अशी टीका राऊत यांनी यापूर्वी केली.

वीज खरेदी कराराचे पुनरावलोकन 
वीज खरेदीसाठी पॉवर एक्स्चेंजमधून दररोज जवळपास ११०० ते १८०० मेगावॅट वीज विकत घेण्यात येते. पॉवर एक्स्चेंजसोबत दरासंबंधी वेळोवेळी वाटाघाटी करून स्वस्त वीज घेण्याचा प्रयत्न केला जात असून, राज्यात वीजेचे दर कमी करण्याठी अनेक प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच वीज खरेदी कराराचे पुनरावलोकन करण्यात येणार असल्याची माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे.