Nitin Raut Letter To CM Uddhav Thackeray | ग्रामविकास, नगरविकास विभागाला महावितरणचा ‘शॉक’?; वीज कापण्याव्यतिरिक्त अन्य पर्याय नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nitin Raut Letter To CM Uddhav Thackeray | गेल्या एक दोन वर्षांपासून थकबाकी वाढू लागल्याने महावितरणची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही दिवसांपासून वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे सरकारी कार्यालयाकडूनच मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याचे समोर आले. दरम्यान, वसुली मोहिमेमुळे महावितरण विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी कृषी वीजपंप ग्राहक, सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिवे यांची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांचा वीज पुरवठा खंडित करणे गरजेचे आहे. या व्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे. (Nitin Raut Letter To CM Uddhav Thackeray)

नितीन राऊत म्हणतात की, थकबाकीमुळे जर वीज पुरवठा खंडित केला तर महावितरण तसेच महाविकास आघाडी सरकारविरुद्ध पर्यायाने काँग्रेस पक्षाचा मंत्री म्हणून माझ्या पक्षाविरुद्ध असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. ग्रामविकास, नगरविकास विभागाकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. इतकंच नाही तर महावितरणचे कोट्यावधीचे अनुदान शासनाकडे अडकले आहे. त्यामुळे आपण महावितरणची ढासळती आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दोन्ही प्रश्न मार्गी लावून सहकार्य करावे असे साकडेही राऊत यांनी घातले आहेत.

दोन कोटी ८० लाखांहून अधिक वीज ग्राहकांना महावितरणकडून अखंडित वीज पुरवठा केला जातो. नैसर्गिक आपत्ती, कोरोनामुळे महावितरण कंपनी मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. विशेषत: कृषी वीजपंप ग्राहकांकडे ४१ हजार १७५ कोटी रुपये इतकी वीजबिल थकबाकी आहे. पण त्यांच्याकडून वसुली नगण्य प्रमाणात होत आहे. राज्यात कृषी पंप धोरण राबवले जातात आहे त्यामुळे काही प्रमाणात का होईना वसुली होत आहे पण महावीतरणचा आर्थिक डोलारा सांभाळण्यास ती पुरेशी नाही, असेही राऊत यांनी म्हंटले आहे. (Nitin Raut Letter To CM Uddhav Thackeray )

सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व सार्वजनिक पथदिवे यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. त्यांसदर्भात उपमुख्यमंत्री, नगरविकास व ग्रामविकास मंत्र्यांबरोबर अनेक वेळा बैठका झाल्या. तालुका पातळीवर वीजबिलांची पडताळणी करून दुरुस्तीदेखील केली. तरीसुद्धा दोन्ही विभागांकडील थकबाकी महावितरणला देण्यात आलेली नाही, असा उल्लेख ही राऊत यांनी या पत्रात केला आहे.

 

पत्रातील काही मुद्दे

महावितरणला बँकांकडून कर घ्यावे लागत असते. महावितरणवर ४५ हजार ५९१ कोटींची कर्ज आहे.
वीजनिर्मिती कंपन्यांची महावितरणकडे १३ हजार ४८६ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
आता कर्ज घेण्यावरही मर्यादा आल्या आहेत. यापूर्वी २५ हजार कोटी पर्यंत कर्ज मर्यादा होती.
पण आता १८ डिसेंबर २०२१ च्या केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कर्जाची मर्यादा १० हजार कोटी रुपये करण्यात आली आहे.

वस्त्रोद्योग, कृषी तसेच औद्योगिक वीज अनुदानापोटी महावितरणला १३ हजार ८६१ कोटी रुपये येणे अपेक्षित असताना ५हजार ८८७ कोटी रुपयेच उपलब्ध करून दिले आहेत. अजून ७ हजार ९७८ कोटी रुपयांचे अनुदान येणे बाकी आहे.

 

तब्बल ८,९२४ कोटींची थकबाकी

       विभाग            वर्गवारी          मूळ थकबाकी                व्याज+डीपीसी              एकूण
ग्रामविकास पथदिवे          ३३७७            २५०४                         ५८८१ 
पाणीपुरवठा               ११०३             ८८१                           १९८४ 
एकूण                   ४४८०             ३३८५                         ७८६५ 
नगरविकास पथदिवे         २३२              २०३                           ४३५ 
सार्व. पथदिवे             २७७             ३४७                           ६२४ 
एकूण                   ५०८             ५५०                           १०५९ 
दाेन्ही विभाग एकूण         ४९८९            ३९३५                         ८९२४

 

Web Title : Nitin Raut Letter To CM Uddhav Thackeray | there is no alternative but to cut off electricity energy minister nitin raut letter to the chief minister uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Skin Care Tips-Raw Milk | जर हवा असेल क्लिअर आणि चमकदार चेहरा वापरा कच्चे दूध

Heart Patients Winter । हिवाळ्यात हृदयाच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

Mother And Son Dance Video | आई-मुलाच्या जोडीने उडवली खळबळ,
‘नाच मेरी रानी’ गाण्यावर डान्स पाहून नोरा फतेहीला देखील पडेल भुरळ

Priyanka Chopra | प्रियांका चोप्रा होणार आई, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

Pushpa Movie Mistakes | ‘पुष्पा’च्या सीनवर जिथे टाळ्या वाजल्या, तिथे झाली एवढी मोठी चूक,
अल्लू अर्जुनच्या चित्रपटात झाल्या ‘या’ 5 मोठ्या चुका

Ilena D’Cruz Oops Moment | ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केल्याने इलयाना डीक्रूझ झाली ‘Oops Moment’ची शिकार