Breaking : नागपूर शहरात Lockdown ची घोषणा झाली, काळजी घ्या

नागपूर : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक ठिकाणी लाँकडाऊन करण्याच्या विचारात सरकार आहे. नागपुरात गेल्या २४ तासात १७०० रुग्णसंख्या झाल्याने लाँकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. आज नागपूरमध्ये काही दिवसासाठी लाँकडाऊन कण्यात आले आहे.

नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या लाँकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवा बंद राहणार आहेत. दवाखाने, बँका सुरु राहणार असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे. ता. १४ ते २१ मार्च या काळात लाॅकडाऊन करण्याची घोषणा नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली.

नागपूरमध्ये १ लाख ६२ जणांना वर्षभरात कोरोनाची लागण झाली आहे. ४२१५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आताही नागपूरमध्ये कोरोनाची संख्या वाढत असल्याने नाईलाजाने लाॅकडाऊनचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राऊत म्हणाले की, होम क्वारंटाईन असलेल्यांनी बाहेर पडू नये. नागरिकांना विनाकारण फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांना कडक संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.