केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा आली भोवळ

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे सोलापूर दौर्‍यावर असताना त्यांना भोवळ आली. ते पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिन कार्यक्रमानिमित्‍त सोलापूर येथे आले होते. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीत चालू असताना त्यांना भोवळ आली. त्यामुळे खळबळ उडाली. यापुर्वी देखील नितीन गडकरी यांना एक-दोन वेळा अशा प्रकारची भोवळ आली होती. दरम्यान भोवळ आल्याने गडकरी उपचार करुन नागपूरला रवाना झाले. त्यामुळे त्यांचा आजचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे.

भोवळ आल्यानंतर काही सेकंदांकरिता गडकरी हे खाली बसले. राष्ट्रगीत चालू असल्याचे त्यांच्या ध्यानात आल्यानंतर ते पुन्हा उठून उभे राहिले. राष्ट्रगीत संपल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्यांची लागलीच तपासणी केली. त्यानंतर गडकरी यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. यापुर्वी राहूरी कृषी विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभासाठी गडकरी उपस्थित होते. त्यावेळी त्यांना अशाच प्रकारची भोवळ आली होती.

आरोग्यविषयक वृत्त –