पक्षात प्रवेश न करताच नितेश राणेंना मिळणार भाजपाचे ‘तिकीट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – स्वाभीमानी पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याचा मुहूर्त सतत पुढे ढकलला जात असताना आज नारायण राणे हे भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. भाजपाच्या दुसऱ्या यादीत कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षात प्रवेश न करताच अजूनही काँग्रेसचे आमदार असलेले नितेश राणे यांना भाजपाचे तिकीट मिळवणार आहे.

कणकवली देवगड हा भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. तेथे गेल्या अनेक विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार निवडून येत होते. अप्पा गोगटे, अजित गोगटे, प्रमोद जठार हे भाजपाचे उमेदवार येथून निवडून गेले होते. चौरंगी लढतीत २०१४ मध्ये काँग्रेसचे नितेश राणे यांनी बाजी मारली होती. त्यानंतर राणे यांनी काँग्रेस ऐवजी भाजपाचा हात धरल्याने नितेश राणे हे केवळ तांत्रिकदृष्ट्या आजही काँग्रेसमध्ये आहेत.
भाजपाच्या दुसऱ्या यादीतून कणकवली देवगडमधून नितेश राणे यांच्या नावाचा समावेश झाला असल्याचे सांगण्यात येते.

Visit : policenama.com