JEE Mains 2020 : NIT आणि इतर प्रवेशाबाबत केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   सध्या देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशातील कोरोना अद्यापही नियंत्रणात आला नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. यात केंद्रीय मनुष्य संसाधन मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी मोठी घोषणा केली आहे.

मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. NIT आणि Centrally Funded Technical Institute मध्ये प्रवेश करण्याबाबत त्यांनी मोठी घोषणा केली आहे.

NIT आणि इतर Centrally Funded Technical Institute मध्ये प्रवेश करण्याबाबत घोषणा करताना म्हटले आहे, या संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी JEE Mains मध्ये यशस्वी होण्या व्यतिरिक्त बारावी बोर्डात 75 टक्के गुण मिळवून पात्र होऊ शकता किंवा दिलेल्या परीक्षेत टॉप 20 percentile रँक असणे गरजेचे आहे. सद्य परिस्थितीमुळे CBAB यांनी NIT आणि इतर संस्थामधील प्रवेश पात्रता शिथिल केली आहे.