शेतकरी संघर्ष संघटना जिल्हा संपर्कप्रमुखपदी निवृत्ती न्याहारकर

लासलगाव, पोलीसनामा ऑनलाइन – शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या शेतकरी संघर्ष संघटनेच्या नाशिक जिल्हासंपर्क प्रमुखपदी निवृत्ती न्याहारकर यांची नियुक्ती करण्यात आली . शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी शेतकऱ्यांचे समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करण्यासाठी तयार असल्याचे निवृत्ती न्याहारकर यांनी सांगितले . यावेळी शेतकरी संघर्ष संघटनेचे विभागीय अध्यक्ष नाना बच्छाव , राम निकम यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते .