NLEM | सरकारने कॅन्सर, डायबिटीज, कोविड आणि टीबीसह 39 औषधांच्या कमी केल्या किमती, पहा यादी

नवी दिल्ली : NLEM | आवश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत (NLEM) दुरूस्ती करून केंद्र सरकारने सामान्यपणे वापरल्या जाणार्‍या 39 औषधांच्या किमती कमी केल्या आहेत. ज्या औषधांच्या किमती कमी केल्या आहेत त्यांच्यात कॅन्सर प्रतिबंधक, डायबिटीज, अँटीवायरल, अँटीबॅक्टेरियल, अँटीरेट्रोवायरल, टीबीवरील औषधांसह इतर औषधांचा समावेश आहे. तसेच कोविडमध्ये वापरल्या जाणार्‍या औषधांचा समावेश आहे.

 

16 औषधे यादीतून हटवली

एनएलइएम सूचीवर काम करत असलेल्या तज्ज्ञांनी 16 औषधे यादीतून हटवली आहेत. इंडियन मेडिकल रिसर्च कौन्सिल (आयसीएमआर) औषधांच्या किमतीवर नियंत्रणासाठी दिर्घ काळापासून काम करत आहे.

 

या औषधांचे मूल्य कॅप अंतर्गत आणले

सामान्यपणे वापरली जाणारी औषधे, ज्यांना मूल्य कॅप अंतर्गत आणले आहे, त्यामध्ये डायबिटीजचे औषध टेनेलिगलिप्टिन, टीबी, कोविडच्या उपचारात वापरले जाणारे आयवरमेक्टिन, रोटाव्हायरस व्हॅक्सीन इत्यादीचा समावेश आहे.

 

स्थायी राष्ट्रीय समितीकडे सोपवले होते काम

सरकारने आवश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत दुरूस्ती करण्याचे काम सुरू केले होते जी 2015 मध्ये अधिसूचित केली गेली आणि 2016 मध्ये लागू केली. औषधांवर स्थायी राष्ट्रीय समितीला यादी तयार करण्याचे काम सोपवले होते.

 

असे ठरते औषधांचे मूल्य कॅप

आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांच्या अध्यक्षतेखालील समिती, नीती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी, आरोग्य सचिव आणि फार्मास्युटिकल विभागाच्या सचिवांच्या दुसर्‍या समितीला यादी पाठवली जाते. दुसरी समिती हे ठरवते की कोणत्या औषधांना मूल्य कॅप अंतर्गत ठेवले जावे.

 

या औषधांचा यादीत झाला समावेश –

  1. Amikacin (antibiotic)
  2. Azacitidine (anti-cancer)
  3. Bedaquiline (anti-TB)
  4. Bendamustine Hydrochloride (anti-cancer)
  5. Buprenorphine ( opioid antagonists)
  6. Buprenorphine+Naloxone (opioid antagonists)
  7. Cefuroxime (antibiotic)
  8. Dabigatran (anticoagulant)
  9. Daclatasvir (antiviral)
  10. Darunavir+Ritonavir (antiretroviral)
  11. Delamanid (anti-TB)
  12. Dolutegravir (antiretroviral)
  13. Fludarabine (anti-cancer)
  14. Fludrocortisone (corticosteroid)
  15. Fulvestrant (anti-cancer)
  16. Insulin Glargine (anti-diabetes)
  17. Irinotecan HCL Trihydrate (anti-cancer)
  18. Itraconazole (antifungal)
  19. Ivermectin (anti-parasitic)
  20. Lamivudine (antiretroviral)
  21. Latanoprost (treat ocular hypertension)
  22. Lenalidomide (anti-cancer)
  23. Montelukast (anti-allergy)
  24. Mupirocin (topical antibiotic)
  25. Nicotine replacement therapy
  26. Nitazoxanide (antibiotic)
  27. Ormeloxifene (oral contraceptive)
  28. Phenoxymethyl penicillin (antibiotic)
  29. Procaine Benzylpenicillin (antibiotic)
  30. Rotavirus vaccine
  31. Secnidazole (anti-microbial)
  32. Teneligliptin (anti-diabetes)
  33. Tenofovir+Lamivudine+Dolutegravir (antiretroviral)
  34. Tenofovir+Alafenamide Fumarate (TAF) (antiretroviral)
  35. Terbinafine (antifungal)
  36. Valganiclovir (antiviral)

 

ही औषधे यादीतून बाहेर काढल्याने महागणार –

  1. Alteplase (clot buster)
  2. Atenolol (anti-hypertension)
  3. Bleaching Powder, Cetrimide (antiseptic)
  4. Erythromycin (antibiotic)
  5. Ethinylestradiol+Norethisterone (birth control)
  6. Ganciclovir (antiviral)
  7. Lamivudine+Nevirapine+Stavudine (antiretroviral)
  8. Leflunomide (antirheumatic)
  9. Nicotinamide (Vitamin-B)
  10. Pegylated interferon alfa 2a
  11. Pegylated interferon alfa 2b (antiviral)
  12. Pentamidine (antifungal)
  13. Prilocaine+Lignocaine (anesthetic)
  14. Rifabutin (antibiotic)
  15. Stavudine+Lamivudine (antiretroviral)
  16. Sucralfate (anti-ulcer)

NLEM 2021 मध्ये आता 399 आवश्यक औषधांची नावे आहेत. ती सध्या प्रत्यक्ष मूल्य नियंत्रणात आहेत. याचा अर्थ या यादीतील सर्व औषधांवर सरकारकडून प्राईस कॅप आहे, ज्यामुळे कमी किमतीत ही औषधे रूग्णांना उपलब्ध होऊ शकतात.

Web Title : NLEM | national govt revises national list of essential medicines nlem and slashes prices of many common drugs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Health Benefits of Bitilasana | डझनभर आजारांना दूर ठेवते ‘हे’ एक आसन, जाणून घ्या त्याचे जबदरस्त लाभ आणि ते कसे करावे

Pune Crime | ज्येष्ठ नागरिकास गुंगीचे औषध देऊन ‘बिंदीया’ने केले 8 लाखाचे दागिने लंपास, कल्याणीनगरमधील घटना

Petrol Price Today | शुभ वार्ता ! पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा ‘कपात’