एसआरपीएफच्या गट क्र. १ ला पुणे महापालिकेचा स्वच्छ पुरस्कार  

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आयएसओ मानांकन मिळालेल्या राज्य राखीव पोलीस बल (एसआरपीएफ) गट क्रमांक १ ला पुणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक क्षेत्रातील स्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छ पुरस्कार – २०१९ ने सन्मानित करण्यात आले आहे. गुरुवारी सावित्रीबाई फुले सभागृहात महापौर मुक्ता टिळक यांच्य हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून किरण देसाई उपस्थित होते.

एसआरपीएफच्या गट क्र. १ ला नुकतेच प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. समादेशक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली हे मानांकन एसआरपीएफच्या गट क्र. १ ला मिळाले होते. त्यानंतर स्वच्छ व सुंदर परिसर ठेवण्यासाठी सर्वोत्तम स्वच्छता अभियान पुरस्कार २०१९ ने बुधवारी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी सन्मानित केले. एसआरपीएफच्या गट क्र. १ ला सलग ३ वर्षे हा पुरस्कार मिळाला आहे.

एसआरपीएफच्या गट क्र. १ चे समादेशक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शाखाली सहायक समादेश राजेंद्र मोरे, सहप्रकल्प अधिकारी सादिकअली सय्यद, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पाटील, रमेश वेठेकर, प्रकल्प समन्वयक दत्तात्रय निकम व विष्णू पवार यांनी यासाठी परिश्रम घेतले.