हा भारताला ‘बदनाम’ करण्याचा प्रयत्न तर नाही ना ? फडणवीसांचा JNU वरून ‘सवाल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जेएनयू हिंसाचार प्रकरणातील हल्लेखोरांचे फोटो दिल्ली पोलिसांनी प्रसिद्ध केले. यावेळी पोलिसांनी माहिती दिली की या हल्यातील नऊ जणांची ओळख पटली असून यांत जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आइशी घोषसह जेएनयूचा माजी विद्यार्थी चुनचुन कुमार, सुचेता आणि प्रिया रंजन यांचा समावेश आहे. दिल्ली पोलिसांनी जेएनयूप्रकरणी केलेल्या या खुलाशानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जेएनयूतील हल्ल्यावर शंका उपस्थित केली.

फडणवीस म्हणाले की दिल्ली पोलिसांनी जेएनयू प्रकरणातील हल्लेखोरांची छायाचित्र आणि महत्वाचे पुरावे जारी केल्याने या हल्लामागे कोण आहे हे स्पष्ट झाले. केवळ राजकीय स्वार्थासाठी डावे आपल्या विद्यापीठांना केवळ युद्धाची मैदानं घडवू पाहत आहेत.

भारत आज लक्षणीय प्रगती करत असून संपूर्ण जगात भारताचा नावलैकिक वाढत आहे. त्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी आणि भारताला बदनाम करण्यासाठी तर हे प्रयत्न तर होत नाहीत ना ? असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला. जेएनयूच्या घरावर हल्ला, अधिष्ठात्यांवर हल्ला, महिला प्राध्यापकांना अपह्रत करुन ठेवणे, सर्व्हर रुममध्ये जाऊन इंटरनेट बंद पाडणे, परिक्षांसाठी नोंदणी न करु देणं यातून कोणता उद्देश निदर्शनास येतो असा प्रश्न फडणवीसांनी विचारला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/