सोलापुरात 55 वर्षे वयाच्या पोलीसांना ‘बंदोबस्त’ ड्युटी लावली जाणार नाही : SP मनोज पाटील

सोलापूर: पोलीसनामा ऑनलाइन – त्या’ पोलिस कर्मचाऱ्याच्या संपर्कातील वाहनचालकासह आणखी एकजण कोरोना पॉझिटिव्ह झाला असल्यामुळे सोलापूर पोलिस दलात खळबळ उडाली आहे दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी 55 वर्षे वयाच्या पोलीसांना बंदोबस्त साठी ड्युटी लावण्यात येणार नाही असे स्पष्ठ केले आहे. ज्यांचे वय 55 वर्षा च्या पुढे आहे त्यांनी ड्युटी वर येऊ नये परंतु ड्युटी नाही म्हणून बाहेर कोठेही फिरू नये असे ही आदेशात बजावले आहे.

55 वर्षांवरील कर्मचाऱ्यांना ड्युटी लावली जाणार नाही. कोरोना या विषाणूपासून नागरिक सुरक्षित राहावेत, या हेतूने रात्रंदिवस रस्त्यांवर पहारा देणारे पोलीसच आता कोरोनाबाधित होऊ लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी सोलापूर शहरातील ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या वसाहतीत राहणारे दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या नमुन्यांची तपासणी केली असता पोलीस वाहनाचा एक चालत तर मंद्रूपजवळील वडकबाळ येथे नाका-बंदी असणारा कर्मचारीही कोरोनाबाधित निघाला आहे. खबरदारी म्हणून आता ग्रामीण पोलीस दलातील 55 वर्षांवरील पोलीस अधिकारी तथा कर्मचाऱ्यांना हद्दपार होईपर्यंत बंदोबस्ताची ड्युटी दिली जाणार नाही, असा निर्णय पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घेतला आहे.

सोलापूर : सांगोला, मंद्रूप (वडकबाळ), बार्शी, सोलापूर शहर परिसरातील ग्रामीण हद्दीत लॉकडाऊनच्या काळात बंदोबस्तासाठी असणारे दोन पोलीस कर्मचारी दोन दिवसांपूर्वी कोरोनाबाधित निघाले. त्यांच्या संपर्कातील आणखी दोन कर्मचारी आज (मंगळवारी) कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. एक पोलिस कर्मचारी एकता नगर येथे तर दुसरा ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या वसाहतीत राहत होता. खबरदारी म्हणून आता हे दोन्ही भाग प्रतिबंधित करण्यात आले आहेत.

कोरोना पासून चार हात लांब असलेले सोलापूर आता संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेत आहे. दिवसेंदिवस रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याची बाब चिंताजनक मानली जात आहे. मात्र, एकमेकांच्या कॉन्टॅक्टमधील लोकांना ट्रेस करून तत्काळ दवाखान्यात हजर केल्याने रुग्ण वाढीचे प्रमाण आटोक्यात असल्याचा विश्वास महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय नवले यांनी व्यक्त केला. आतापर्यंतच्या रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील केवळ चार रुग्ण आहेत. ग्रामीण जनतेसह ग्रामीण पोलीस अधिकारी व कर्मचारी ही कोरोनापासून दूरच होते. मात्र, काही दिवसांपासून कोरोना या विषाणूने ग्रामीण भागात हळूहळू पाय पसरायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. दुसरीकडे कोरोनाला जागच्याजागी रोखून नागरिकांना अधिकाधिक सुरक्षित करणारे पोलिसही कोणाचे शिकार होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ग्रामीण पोलीस दलातील 55 वर्षांवरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना हद्दपार होईपर्यंत बंदोबस्ताची ड्युटी दिली जाणार नाही. मात्र, या काळात सर्व कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या घरातच थांबणे बंधनकारक असणार आहे.

नव्या रूग्णांच्या संपर्कात 100 जण
ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या वसाहतीत आढळलेल्या कोरोनाबाधित दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्याचे अहवाल आज (मंगळवारी) प्राप्त झाले असून त्यामध्ये आणखी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. आता या नव्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील तब्बल 90 ते 100 पोलीस कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.