1 एप्रिलपासून तुमची ‘टेक होम सॅलरी’ कमी नाही होणार; ‘New Wage Code’ लागू करण्याचा निर्णय तहकूब

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   १ एप्रिल २०२१ पासून लागू होणारा ‘New Wage Code’ सध्या तहकूब केला जात आहे. त्यामुळे कंपन्यांसह कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कामगार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, New Wage Code काही वेळासाठी तहकूब केला गेला आहे. १ एप्रिल २०२१ पासून कामगारांच्या सैलारी स्ट्रक्चरमध्ये बदल होणार नाही, त्यामुळे आता टेक होम सॅलरीमध्ये घट होणार नाही.

EPFO चे सदस्य विजय उपाध्याय यांनी नवीन कोड पुढे ढकल्याची पुष्टी केली आहे. आमची अधिकृत वेबसाईट Zeebiz.com च्या मते, त्यांनी सांगितले आहे की नवीन वेज कोडवरअजूनही चर्चा केली जात आहे. लवकरच पुढील निर्णय घेण्यात येईल.

काही दिवसांपासून नवीन वेज कोड चर्चेत आहे. असे म्हंटले जात आहे की नवीन वेज कोड १ एप्रिलपासून लागू होईल. तथापि, सरकारने याबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. माहिती देणारे असेही म्हणत होते की, असे सांगितले जात आहे की वेज कोडमध्ये व्यापारिक कमी आहेत. त्यामुळे याला लागू केला जात नाही आहे.

New Wage Code

वेज कोड ऍक्ट २०१९ नुसार, कोणत्याही कामगाराची बेसिक सॅलरी कंपनीच्या CTC च्या ५०% पेक्षा कमी असू नये. आता अनेक कंपन्या बेसिक सॅलरी कमी करून जास्त भत्ते देतात, कारण कंपनीवरील ओझे कमी व्हावे.

सॅलरी स्ट्रक्चर पूर्णपणे बदलले

वेज कोड ऍक्ट २०१९ लागू झाल्यानंतर कामगारांचे सॅलरी स्ट्रक्चर पूर्णपणे बदलेल. कामगारांची टॅक होम सॅलरी कमी होईल, कारण Basic Pay वाढल्यामुळे कामगारांचा PF जास्त कापला जाईल, म्हणजेच त्यांचे भविष्य जास्त सुरक्षित असेल. PF सोबत Monthly Gratuity मध्येही योगदान वाढेल. म्हणजेच टेक होम सॅलरी नक्की कमी होईल, पण कामगारांना रिटायरमेंटनंतर जास्त पगार मिळेल.

टेक होम सॅलरी घटेल, रिटायरमेंट सुधारेल

मूळ वेतन वाढल्यामुळे कामगारांचा PF जास्त कट होईल, त्यामुळे त्यांच्या टेक होम सॅलरीत घट होईल. परंतू त्यांचे भविष्य जास्त सुरक्षित होईल. त्यामुळे त्यांच्या सेवानिवृत्तीवर जास्त लाभ मिळेल, कारण भविष्य निधी आणि मासिक Gratuity मध्ये त्यांचे योगदान वाढेल.

कंपन्यांची डोकेदुखी वाढेल

कामगारांचा CTC अनेक वैशिष्ट्यांवर अवलंबून असतो. जसे की, बेसिक सॅलरी, घरभाडे, PF, Gratuity, LTC आणि करमणूक भत्ता इ. नवीन सॅलरी कोड नियम लागू झाल्यानंतर कंपन्यांना हे ठरवावे लागेल की बेसिक सॅलरी सोडून CTC मध्ये समाविष्ट केले जाणारे दुसरे फॅक्टर्स ५०% पेक्षा जास्त होऊ नयेत. त्यामुळे कंपन्यांची डोकेदुखी वाढू शकते.