‘स्वीस’ बँकेत 10 भारतीयांच्या खात्यात कोट्यावधी रूपये पडून, घेण्यासाठी कोणीही ‘वारस’ नाही
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्विस बँकांमधील सुमारे डझनभर भारतीयांच्या निष्क्रिय खात्यांबाबत कोणीही दावेदार समोर आले नाहीत. त्यामुळे या खात्यात पडून असलेली रक्कम स्वित्झर्लंड सरकारकडे जमा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्विस सरकारने 2015 मध्ये निष्क्रिय खात्यांचा तपशील सार्वजनिक करण्यास सुरुवात केली. त्याअंतर्गत या खात्यांच्या दावेकर्त्यांना खात्याचा निधी मिळविण्यासाठी आवश्यक पुरावे द्यावा लागले. यापैकी 10 खाती भारतीयांची आहेत. यापैकी काही खाती ब्रिटिश काळातील भारतीय रहिवासी नागरिकांशी संबंधित आहेत. स्विस अधिकाऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या सहा वर्षांत कोणत्याही भारतीय वारसांनी या खात्यांवर दावा केलेला नाही. यातील काही खात्यांचा दावा कालावधी पुढील महिन्यात संपेल. मात्र 2020 संपेपर्यंत काही अन्य खात्यांवर दावा केला जाऊ शकतो.
विशेष म्हणजे, निष्क्रिय खात्यांपैकी पाकिस्तानी रहिवाश्यांशी संबंधित काही खात्यांचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय स्वित्झर्लंडसह इतर काही देशांतील रहिवाशांच्या खात्यावरही दावा करण्यात आला आहे.
2600 खात्यात 300 कोटी रुपये
डिसेंबर 2015 मध्ये प्रथमच अशी खाती सार्वजनिक केली गेली. या यादीमध्ये सुमारे 2,600 खाती आहेत, त्यापैकी 4.5 कोटी स्विस फ्रँक (सुमारे 300 कोटी ) इतकी रक्कम पडून आहे. 1955 पासून या रकमेवर दावा केलेला नाही. स्विस बँकिंग कायद्यांतर्गत दरवर्षी या खात्यात नवीन खाती जोडली जात आहेत. आता या यादीतील खात्यांची संख्या सुमारे 3,500 झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून स्विस बँक खाती ही राजकीय चर्चेचा विषय ठरली आहे. भारतीय त्यांचे ब्लॅक मनी स्विस बँकांमध्ये ठेवतात. पूर्वीच्या रियासतांच्या वतीने स्वित्झर्लंडच्या बँक खात्यात निधी ठेवण्यात आल्याची शंका देखील व्यक्त केली जात आहे. अलिकडच्या काही वर्षांत जागतिक दबावामुळे स्वित्झर्लंडने नियामक तपासणीसाठी आपली बँकिंग प्रणाली उघडली आहे. याव्यतिरिक्त, स्वित्झर्लंडने देखील आर्थिक बाबींविषयी माहितीच्या स्वयंचलित देवाणघेवाणीसाठी भारतासह विविध देशांशी करार केले आहेत.
Visit : Policenama.com
- अचानक ‘गोड’ किंवा ‘जंकफूड’ खाण्याची इच्छा हे ‘टेन्शन’चे लक्षण, जाणून घ्या अन्य लक्षणे
- जास्त ‘प्रोटिन्स’चा होतो ‘किडनी’वर परिणाम, असे ओळखा प्रोटिन्सचे प्रमाण
- भरपूर खा…आणि वजनही ठेवा नियंत्रणात, जाणून घ्या पद्धत
- ‘स्मोकिंग’च्या सवयीने त्रस्त आहात का ? योगा करा आणि सोडवा व्यसन
- कॅटरिनासारखी ‘टॉवेल एक्झरसाइज’ करा आणि ‘स्लीम’ व्हा
- शांत झोप येत नाही का ? मग आहारात ‘हे’ आवश्य घ्या, जाणून घ्या
- चालण्याचे ‘हे’ आहेत ५ मोठे फायदे, तूम्हाला माहित आहेत का ? जाणून घ्या