अद्यापही दीपिका, सारा आणि श्रध्दाच्या अडचणी नाही संपल्या, NCB कडून क्लीन चीट नाहीच…

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआय तर, दुसरीकडे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अमली पदार्थांची चौकशी करत आहे. यामध्ये अनेक मोठ्या कलाकारांची नावे समोर आली असून, NCB ने गेल्या आठवड्यात अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि राकुलप्रीत सिंह यांची चौकशी केली आहे. तथापि, या सर्व कलाकारांना NCB ने क्लीन चिट दिल्याची चर्चा सर्वत्र सुरु होती. पण आता NCB कडून बुधवारी या चर्चेचे खंडन करण्यात आले आहे.

NCB च्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, ज्या बातम्यांमध्ये सांगण्यात आले आहे की, ज्यांची चौकशी करण्यात आली होती त्यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. मात्र, यामध्ये काहीच तथ्य नाही. आमचा तपास सुरु आहे. जसजसे पुरावे मिळतील, ते आम्ही पुढे पाठवत जाऊ. NCB ने शनिवारी दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि करिश्मा यांची चौकशी केली होती.

साराने सांगितलं सुशांतसोबतच्या रिलेशनशिपबद्दल

NCB ने साराची ५ तास चौकशी केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, साराने यावेळी सुशांत आणि तिच्या रिलेशनशिपबाबत सांगितलं आहे. साराने पुढे, सुशांत ड्रग्ज घेत होता. तसेच सुशांत रिलेशनशिपमध्ये लॉयल नसल्याचं सांगत, मी स्वतः ड्रग्ज घेत नसल्याचं कबूल केलं आहे.

दीपिकाने सांगितले सिगारेटचे कोड वर्ड्स

दीपिकाने NCB च्या चौकशीदरम्यान ड्रग्स घेत नसल्याचं सांगितलं आहे. दीपिकाला जेव्हा चॅटबाबत विचारलं होते त्यावेळी तिने सांगितलं की, मित्रांमध्ये तिने वेगवेगळ्या प्रकारच्या सिगारेटसाठी कोड वर्ड्स दिले होते. तेच दीपिकाच्या मॅनेजरनेसुद्धा असाच जबाब नोंदवला.

सुशांत ड्रग्स घेत असल्याच श्रद्धाने सांगितलं

मिळालेल्या बातमीनुसार, श्रद्धा कपूरनेही सुशांत हा ड्रग्स घेत असल्याचं NCB समोर सांगितलं आहे. ती ‘छिछोरे’च्या सक्सेस पार्टीत सहभागी झाली होती. मात्र, तिथे ड्रग्स नाहीतर ड्रिंक्स सर्व्ह करण्यात आले होते. तसेच आपण कधीही ड्रग्स घेत नसल्याचं श्रद्धाने कबूल केलं आहे.