Coronavirus : ‘कोरोना’चे कम्युनिटी ट्रान्समिशन तर सुरु झाले नाही ना ?, आरोग्य मंत्रालयाने दिले ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   देशात कोरोना विषाणूचा धोका अद्याप कमी झालेला नाही. गेल्या 24 तासात विक्रमी मृत्यूने पुन्हा एकदा लोकांना विचार करायला लावला आहे. यामुळे आता असा प्रश्न उपस्थित होतो की, कोरोना विषाणूमुळे कम्युनिटी ट्रान्समिशन (समुदाय प्रसार) सुरु झाले आहे का ? यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाचे लव अग्रवाल यांना विचारले असता त्यांनी नकार ही दिला आणि मान्य ही केले नाही. परंतु केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कोरोनाचे कम्युनिटी ट्रान्समिशन सुरु झाल्याचे नाकारले आहे.

लव्ह अग्रवाल यांनी सांगितले

लव अग्रवाल यांना विचारले गेले की, गेल्या 24 तासात कोरोना विषाणूमुळे झालेल्या मृत्यूंच्या संख्येवरून देशात कम्युनिटी ट्रान्समिशन सुरु झाले आहे का ? यावर बोलताना त्यांनी उत्तर देताना सांगितले की, बऱ्याच राज्यांनी अहवाल देण्यास उशीर केला आहे. ज्यामुळे गेल्या 24 तासांत मृत्यूंची संख्या पूर्णपणे वाढली आहे. परंतु आम्ही प्रत्येक क्षेत्रावर बारकाईने नजर ठेवून आहोत. जिथे जिथे एक जरी रुग्ण आढळून येत आहे तो परिसर आम्ही कंटेनमेंट झोन करत आहोत. तसेच आरोग्य विभागाचे पथक घरोघरी जाऊन लोकांची तपासणी करत आहे. त्यांनी पुढे सांगितले की, हे युद्ध एकट्याने जिंकता येणार नाही. यासाठी लोकांच्या सहकार्याची गरज आहे. लोकांनी स्वत:हून खबरदारी घेतली पाहिजे. जेणेकरून हा विषाणूचा फैलाव रोखता येईल.

आपण यशस्वी झालो – डॉ. हर्षवर्धन

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, कोरोनाला सामुदाय पातळीवर पसरण्यापासून भारताने रोखले आहे. त्याचबरोबर त्यांनी अशी आशा व्यक्त केली की, कोरोना व्हायरसच्या संकटामुळे लोकांच्या सवयीत बदल झाला आहे. त्यामुळे या साथीच्या आजाराच्या प्रतिबंधानंतर निरोगी समाजासाठी नवीन सामान्य वर्तन असेल.

अर्थव्यवस्था आणि लॉकडाऊन बद्दल आरोग्यमंत्री म्हणाले

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, कोरोना व्हायरसच्या संकटाच्या समाप्तीनंतर भारतीयांनी दररोज हात धुण्याची, श्वसना संबंधी आणि पर्यावरणविषय स्वच्छतेची सवय कायम ठेवल्यास भविष्यात जेव्हा हा देश महामारीच्या दरम्यानची परिस्थिती आठवले त्यावेळी देशातली नागरिकांना वाटेल वाईट काळात मिळालेले हे वरदान आहे. अर्थव्यवस्थेप्रमाणेच आरोग्यावरही पूर्ण लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांनी सांगितले की सरकारला संतुलित काम करावे लागले.