Lockdown in Maharashtra : 15 मे नंतर निर्बंध शिथिल होणार का? तर आरोग्यमंत्री म्हणतात…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार, राज्यात लॉकडाऊनसदृश्य अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. पण आता हे निर्बंध 15 मेनंतर शिथिल होणार का, यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केले.

मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत राजेश टोपे यांनी विधान केले. ते म्हणाले,’लॉकडाऊनसंदर्भात ज्या अटी आहेत, त्या लगेच कमी केल्या जाणार नाहीत. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संदर्भात योग्य तो निर्णय घेणार आहेत. बुधवारी मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात येईल. तसेच ‘रेमडेसिव्हिर इंजेक्शन ग्लोबल टेंडर काढले जाणार आहे. 6 कंपन्या यासाठी इच्छुक आहेत. साधरण प्रत्येक कंपनी किमान 50 हजार इंजेक्शन उपलब्ध करून देईल’.

लसीकरण थांबणार

केंद्राकडून लसीचा साठा उपलब्ध होत नसल्याने अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. केंद्र सरकारकडून कोविशिल्डचे 16 लाख डोस येणे बाकी आहे. मात्र, लस उपलब्थ होत नसल्याने राज्य सरकारने खरेदी केलेले 3 लाख डोस आता 45 वर्षांवरील व्यक्तींना दिले जाणार आहेत. त्यामुळे राज्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबेल, असे संकेत राजेश टोपे यांनी दिले आहे.