Pune : गणेश उत्सव होईपर्यंत पाणी कपात नाही, महापौरांनी दिली माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरण क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातील पाणी साठ्यामध्ये समाधानकारक वाढ होत आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती लक्षात घेता, गणेश उत्सव होईपर्यंत शहरात पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार नाही. यानंतरच्या पुढील बैठकीत पाणी कपातीवर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुणे शहराच्या पाणी नियोजनाबाबत आज महापालिकेत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकिनंतर महापौरांनी ही माहिती दिली. महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मागील वर्षी आजच्या दिवशी 97 टक्के आणि 28 टीएमसी एवढा पाणीसाठा होता. मात्र, यंदा शहर आणि धरण क्षेत्रात पावसाने पाठ फिरवली असल्याने, सद्य स्थितीला धरण क्षेत्रात केवळ 9 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

त्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून 15 ऑगस्टपर्यंत शहर, जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. त्यानंतर महिना अखेर पर्यंत 104 टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात पडत असलेला पाऊस आणि आगामी गणेश उत्सव लक्षात घेता पुणे शहराच्या पाणी कपातीचा निर्णय घेतला गेला नाही. मात्र, गणेशोत्सवानंतर परिस्थितीचा अंदाज घेऊन पाणी कपातीचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like