कामाची गोष्ट ! ‘आधार’कार्डवरील मोबाईल नंबर ‘या’ पध्दतीनं करा ‘अपडेट’, एकदम सोपा मार्ग, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कार्ड हे सध्याचे महत्वाचे ओळखपत्र आहे. अनेक सरकारी कामांसाठी आधारची गरज पडते. त्यामुळे जर तुम्ही तुमचा मोबाइल क्रमांक बदलला असेल तर लवकर तो आधारला जोडून घ्या. नुकतेच UIDAI ने आधाराला मोबाइल नंबर जोडण्याची प्रक्रिया सांगितली आहे. याबाबत ट्विट करून UIDAI ने माहिती दिली आहे.

या ट्विटमध्ये UIDAI ने म्हंटले की, जर तुम्हाला देखील आपल्या आधाराला मोबाइल क्रमांक लिंक करायचा असेल तर आता कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही. तुम्ही तुमचे आधार घेऊन जवळच्या सेवा केंद्रामध्ये जा आणि मोबाइल नंबर अपडेट करा.

का आहे मोबाइल नंबर अपडेट करणे गरजेचे –
मोबाइल नंबर आधाराला जोडण्यासाठी तुम्हाला केवळ 50 रुपये खर्च येणार आहे. ज्यावेळी तुम्ही आधारच्या साहाय्याने एखादे महत्वाचे काम करत असता त्यावेळी तुमच्या रजिस्टर मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी येतो जर तुमचा नंबर बदललेला असेल तर तुम्हाला ओटीपी मिळणार नाही आणि तुम्ही करत असलेले काम अर्धवट राहील. म्हणून मोबाइल क्रमांक आधाराला जोडणे खूप महत्वाचे आहे.

असा अपडेट करा मोबाइल नंबर –
अशा परिस्थितीत, आपल्यालाही काही कारणास्तव आपल्या आधारशी जोडलेला मोबाइल नंबर अपडेट करायचा असेल तर आपल्या जवळच्या आधार सेवा केंद्रात जावे लागेल. येथे आपण 50 रुपये खर्च करून आपला मोबाइल नंबर आपल्या आधारमध्ये अपडेट करू शकता. तसेच, जर तुम्हाला तुमच्या आधार क्रमांकाशी संबंधित कोणतीही सेवा घ्यायची असेल तर तुम्ही आधार सेवा केंद्रातून ऑनलाईन अपॉईंटमेंट घेऊ शकता.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like