निवडणूक आयोगाची अभूतपूर्व कारवाई, गृहसचिवांची ‘उचलबांगडी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने अभूतपूर्व निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीचा प्रचार गुरुवारी (दि.१६) रात्री दहा वाजता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसचे राज्याच्या गृहसचिवांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा निषेध करताना अमित शहा यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला होता. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोग डोळ्यावर पट्टी बांधून बसला आहे. आयोगाला जर लाज वाचवायची असेल तर तृणमूलच्या नेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शहांनी केली होती.

निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेत एक दिवस आगोदरच प्रचार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आजपर्यंतच्या इतिहासात अशा प्रकारे प्रचार बंद करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पश्चिम बंगालमध्ये १९ मे रोजी मतदान होत असून प्रचार १७ मे रोजी बंद होणार होता. मात्र काल झालेल्या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

You might also like