30 दिवसांपासून वाकी खुर्द गाव अंधारात !

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – लासलगाव जवळील वाकी खुर्द गावाला पुरवठा करणाऱ्या विजेच्या ट्रान्सफार्मर जळून बिघाड झाल्याने येथील जवळपास ३० कुटुंब हे एक महिन्यापासून अंधारात आहे. या बिघडामुळे पिंपळगांव नजीक आणि वाकी खुर्द येथील वस्तीमधील गावकऱ्यांच्या विद्युत मोटारींसह घरगुती विद्युत प्रवाह बंद असून त्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे. वीज कंपनीकडून याबाबत ३ आठवड्यापासून दुरुस्ती साठी रोहित्र खोलून नेले आहे मात्र अद्याप पर्यंत रोहित्र दुरुस्त करून लावण्यात आले नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

येथील गावात विद्युत रोहित्रात बिघाड होऊन ते जळाले. कोरोनामुळे सध्या शाळा आणि कॉलेज हे डिजिटल च्या माध्यमातून सुरू आहे मात्र येथील विद्यार्थ्यांना गेल्या एक महिन्या पासून वीज नसल्याने यांना शिक्षणापासून व्यंचीत रहावे लागत आहे. वीज कार्यान्वित नसल्याने विद्युत मोटारी, पाणीपुरवठा यासह पिठाच्या गिरण्या बंद असून दळणासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. गेल्या ३० दिवसांपासून गाव पूर्ण अंधारात आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांना अंधारात जीव मुठीत धरुन राहावे लागत आहे. महावितरणला यासंदर्भात माहिती देऊनही दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

रोहित्रात बिघाड झाल्याची माहिती महावितरण कंपनीला देऊनही दुर्लक्ष केले जात आहे. रोहित्र दुरुस्ती करण्यासाठी ३ आठवड्या पासून नेलेले आहे मात्र अद्यापही महावितरण कंपनी कडून याबाबत काहीही काम केलेले नाही.
संजय वाकचौरे, शेतकरी वाकी खुर्द

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like