शिवसेनेचे दिग्गज नेते दिवाकर रावतेंना मातोश्रीवर ‘नो-एन्ट्री’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला अनेक जागांवर विजय मिळाला आहे. असे असले तरी शिवसेनेला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दीवाकर रावते यांना हे समजल्यानंतर त्यांनी लगेचच मातोश्रीवर धाव घेतली. परंतु त्यांना मातोश्रीवर जाण्यास मज्जाव करण्यात आला. यानंतर त्यांना शिवसेना भवनात जाऊन ठाकरेंची वाट पहावी असा सल्ला देण्यात आला.

कालच विधानसभेच्या निकालाची मतमोजणी झाली. सकाळपासूनच पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष निकालाकडे लागलं होतं. रावतेंचंही निकालाकडे लक्ष होतं. शिवसेनेच्या जागा अपेक्षे प्रमाणे येत नाहीत हे पाहिल्यानंतर ते मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला निघाले होते. परंतु मातोश्रीवर जाण्यास त्यांना मात्र मज्जाव करण्यात आला. रावतेंनी वारंवार सांगितले की, त्यांना उद्धव ठाकरेंना भेटायचे आहे. तरीही त्यांना एन्ट्री मिळाली नाही. साहेबांनी आपल्याला भेटायला नकार दिला आहे. साहेब तुम्हाला शिवसेना भवनात भेटतील असाच निरोप रावतेंना देण्यात आला. त्यांना शिवसेना भवनात ठाकरेंची वाट पहावी लागली.

महायुतीला विधानसभेत बहुमत मिळालं असली तरी अनेक ठिकाणी अनेक जागांवार युतीची पडछड पाहायला मिळाली. काही ठिकाणांहून धक्कादायक निकाल समोर येताना दिसले. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने मिळवलेला आकडाही त्यांना युतीत राहून गाठता आला नाही.

Visit : Policenama.com