Fact Check : WHO नं नाही जारी केला भारतामध्ये Lockdown चा कोणताही ‘प्रोटोकॉल’, सरकारनं ‘तो’ व्हायरल मेसेज ‘फेक’ असल्याचं सांंगितलं

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या प्रत्येक व्यासपीठावर एक संदेश व्हायरल होत आहे. या संदेशामध्ये जागतिक आरोग्य संघटनेद्वारे (डब्ल्यूएचओ) लॉकडाऊनच्या वेळापत्रकाचा दावा केला जात आहे. यावर आता सरकारने प्रतिक्रिया दिली आहे. हा संदेश पूर्णपणे बनावट असल्याचे प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने (पीआयबी) म्हटले आहे. “डब्ल्यूएचओने असे कोणतेही प्रोटोकॉल किंवा कोणतीही लॉकडाउन प्रक्रिया जारी केलेली नाही,” असे पीआयबी या सरकारी एजन्सीच्या वतीने म्हटले आहे. पीआयबी व्यतिरिक्त डब्ल्यूएचओच्या दक्षिण-पूर्व आशियानेही स्पष्टीकरण दिले आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की अशा कोणत्याही बातम्या सोशल मीडियावर शेअर केल्या जातात ती पूर्णपणे बनावट असतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजमुळे बर्‍याच लोकांची चिंता वाढली असून प्रत्येकजण अस्वस्थ झाला. दरम्यान, 24 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली. लॉकडाउन तीन आठवड्यांचे होते, जे 14 एप्रिल रोजी समाप्त होईल.

काय आहे व्हायरल मॅसेज :

फेसबुक व त्यानंतर हळूहळू व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये असे सांगितले की डब्ल्यूएचओने लॉकडाऊनचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या संदेशामध्ये असे म्हटले होते की संस्थेने लॉकडाऊनला चार टप्प्यात विभागले आहे आणि भारत सरकार त्याचे अनुसरण करीत आहे. संदेशानुसार, पहिल्या टप्प्यात एक दिवसाचा लॉकडाउन होईल आणि त्यानंतर 21 दिवसांच्या लॉकडाउनसह दुसरे टप्पा सुरू होईल. पाच दिवस शिथिल केले जाईल. पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर, लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू होईल जो 28 दिवसांचा असेल. यानंतर, ते पुन्हा पाच दिवस शिथिल केले जाईल. मग शेवटचा टप्पा असेल जो 15 दिवसांचा असेल.

डब्ल्यूएचओकडून लॉकडाऊनचे कौतुक

कोरोना विषाणूविरूद्धच्या युद्धात भारतामध्ये तीन आठवड्यांच्या लॉकडाउनने विजय मिळविला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) डॉक्टर डेव्हिड नाबारो यांनी या लॉकडाउनवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांना या साथीच्या रोगाचा विशेष दूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. डॉ. नाबारो यांनी भारताच्या या निर्णयाला एक धाडसी निर्णय म्हटले आहे. ते म्हणाले की, जेव्हा भारतात काही प्रकरणांचे अहवाल आले होते, त्याच वेळी देशात एक दूरदर्शी निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे देशाला या आजाराचा सामना करण्याची संधी मिळाली.

युरोपियन थिंक टँकनेही केले कौतुक

याशिवाय युरोपमधील थिंक टँकनेही लॉकडाऊनबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचे कौतुक केले. थिंक टँकच्या मते पीएम मोदी यांनी जाहीर केलेल्या 21 दिवसांचे लॉकडाउन कोविड – 19 विरुद्धच्या युद्धात अत्यंत महत्त्वाचे आहे. अ‍ॅम्‍सर्टडम स्थित थिंक टँक, युरोपियन फाउंडेशन फॉर साउथ एशिया स्टडीज (ईएफएसएस) यांनी म्हटले आहे की, भारत लॉकडाउनचा सरकारचा निर्णय योग्य दिशेने एक संवेदनशील आणि प्रमुख पाऊल आहे. 1.3 अब्ज लोकांचे लॉकडाउन हा सोपा आणि सहज निर्णय नसेल. भारतासारख्या देशात, जेथे वेगवेगळ्या डेमोग्राफीचे लोक शहरे आणि खेड्यांमध्ये राहतात.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like