काय सांगता ! नो फ्रेंड – नो बँक बॅलन्स तरीही मृतदेहावर 7 पत्नींचा दावा, पोलीस ‘हैराण-परेशान’

हरिद्वार : वृत्तसंस्था – हरिद्वारच्या धर्मनगरीमधून एक अजब प्रकरण समोर आलं आहे. हे पाहून पोलीसही चक्रावले आहेत. हे प्रकरण म्हणजे पोलिसांसाठी कोडंच बनलं आहे. कधी कल्पनाही केली नसेल असं प्रकरण धर्मनगरीच्या पोलिसांच्या पदरात पडलं आहे.

हरिद्वारमधून एका चाळीस वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. या व्यक्तीच्या मृतदेहावर चक्क पाच महिलांनी हक्क सांगितला. धक्कादायक बाब तर ही होती या पाचही महिला त्याची पत्नी असल्याचं सांगत होत्या. इतकेच नाही तर आपल्या पतीच्या आयुष्यात इतर कोणी आहे हे माहीत नसल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी कशीतरी समजूत काढून त्याच्यावर अत्यसंस्कार केले. यानंतर जे काही झाले त्यानंतर मात्र तुम्हाला चक्रावून टाकू शकतं. कारण या 5 महिला पोलिसात असतानाच अन्य दोन महिला तेथे आल्या आणि त्यांनी तो व्यक्ती आपला पती असल्याचे सांगितले. पोलिसांना तर आता अशी भीती वाटत आहे की, आणखी काही महिला पोलिसात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी आणखी काही दिवस थांबण्याचे ठरवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने रविवारी रात्री विष प्राशन करून आत्महत्या केली. ड्रायव्हर असणाऱ्या या व्यक्तीचे नाव पवन कुमार आहे. कोणताही बँक बॅलन्स नसलेल्या पवनने आर्थिक संकटामुळे आत्महत्या केली. त्याला कोणताही मित्र नाही. त्याला रुग्णलयात दाखल करणारी व्यक्ती एक महिलाच होती जी त्याची पत्नी असल्याचे सांगत आहे.

Visit : Policenama.com