ताज्या बातम्यामुंबई

Hyatt Regency Mumbai : ‘हयात रिजेन्सी’कडे कामगारांचे पगार द्यायला पैसेच शिल्लक नाहीत; कामकाज बंद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लोकांना संकटात टाकलं आहे. अनेक व्यवसाय धंदा डबघाईला आला आहे. याचप्रमाणे मुंबईमधील हयात रिजेन्सी (Hyatt Regency) हॉटेलची परिस्थिती अशीच झाली आहे. या हॉटेलकडे (Hyatt Regency) त्यांच्या कामगारांचा पगार भागवण्यासाठी सुद्धा पैसे शिल्लक नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे हॉटेलचे कामकाज बंद ठेवण्यात आलं आहे.

कामगारांच्या पगाराबाबत आणि हॉटेल बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती खुद्द हॉटेलने दिली आहे. निधीचा तुटवडा असल्याने आगामी आदेशापर्यंत हॉटेल बंद राहिल.

हॉटेल चालवणारी कंपनी एशियन हॉटेल्सकडे निधी शिल्लक नाही, म्हणून कामकाज बंद करावं लागत आहे.

असं हॉटेलच्या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

तर, हयात रिजेन्सी Hyatt Regency चालवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी हॉटेलचे मालक असलेल्या एशियन हॉटेल्स वेस्ट लिमिटेडकडून कोणताही निधी येत नसल्याची माहिती हॉटेलच्या सर्व ऑन-रोल स्टाफला दिली आहे.

म्हणून हॉटेलचं सर्व कामकाज तात्काळ बंद केलं आहे.

असं हॉटेल प्रशासनाने त्या पत्रकात म्हटलं आहे.

दरम्यान, हयात रीजेंसी Hyatt हॉटेल आगामी आदेशापर्यंत बंद असणार आहे.

पर्यटन आणि ट्रॅव्हलशी संबंधित आदरातिथ्य क्षेत्राला अधिकसा फटका बसला आहे.

शिवाय या क्षेत्राला सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही.

अनके काही दिवस झाली हॉटेल, रेस्टारंट बंद आहेत.

पर्यटन मंडळी, ग्राहकाचा अभाव असलयाने हॉटेल चालत नाही.

अशा स्थितीत कामगारांचा पगार कसा आणि कधीपर्यंत द्यायचा हा प्रश्न कंपन्यां पुढं आहे.

कोरोनाच्या काळामुळे प्रवाशी ग्राहक येत नसल्याने आर्थिक गणिताचा मेळ लागत नाही.

यामुळे हयात रिजेन्सी (Hyatt Regency) हॉटेल बंद केला असल्याचे सांगितले आहे.

 

दररोज दह्यासोबत गुळाचं सेवन या वेळी करा, Immunity वाढण्यासह होतील ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या

 

Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची पीएम मोदींसोबत सकारात्मक बैठक, नंतर मांडले ‘हे’ महत्वाचे मुद्दे

 

फुफ्फुसांना ‘निरोगी’ ठेवायचंय तर ‘ही’ 5 योगासने करा, कोरोनापासून होईल बचाव, जाणून घ्या

 

भाजपचा CM ठाकरेंवर निशाणा, म्हणाले – ‘झेपत नाही, कळत नाही, वसुलीपुढे सरकत नाही, सतत मागत राहता, …यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये?’

Back to top button