‘देश हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर’ या फ्रान्सिस दिब्रिटोंच्या वक्तव्यावर अरुणा ढेरे म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांनी जेएनयु हिंसाचाराबद्दल बोलताना शुक्रवारी म्हटलं होतं की, देश हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर उभा आहे. याशिवाय त्यांनी मोदी सरकारवरही टीका केली होती. यानंतर आता साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी आपलं मत मांडलं आहे. देश कुठल्याही हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर नाही असं त्यांनी म्हटलं आहे. देशात असं काहीही नाही असं त्यांनी आज म्हटलं आहे. आपण सगळे सुजाण नागिरक आहोत. आपण का अशा हिटलरशाहीच्या मागे जाऊ. साहित्यिकांवर कोणताही दबाव नाही असंही त्या म्हणाल्या आहेत. एका मुलाखतीत त्या बोलत होत्या.

अरुणा ढेरे नेमकं काय म्हणाल्या ?

अरुणा ढेरे म्हणाल्या, “साहित्य आणि समाज यांमधल्या बदलांबाबत 93 व्या संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो हे फारसं काही बोलले नाहीत. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने त्यांनी दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्येचे विषय भाषणात घेतले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि इतर विषयांवरही ते बोलले. ती तळमळ खरी होती. सध्या देशात जे घडतंय त्याचे पडसाद संमेलनात उमटणे हे स्वाभाविक होतं. परंतु या संमेलनाच्या व्यासपीठावर साहित्याबाबत बोलण्यापेक्षा त्या पडसादांवरच जास्त भाष्य करण्यात आलं.”

हिटलरशाहीबाबत त्यांना प्रश्न विचारल्यानंतर यावर बोलताना अरुणा ढेरे म्हणाल्या, “हा प्रश्न तुम्ही का विचारताय माहिती नाही. अशी कोणतीही परिस्थिती सध्या देशात नाही. आपण सगळे सुजाण नागरिक आहोत. आपण कशाला हिटलरच्या मागे जाणार आहोत. असं काही होणार नाही.”

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/